Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

क्रांतिवीर बहादूर खाज्या नाईक प्रेरणा दिवस

team by team
April 12, 2022
in सामाजिक
0
क्रांतिवीर बहादूर खाज्या नाईक प्रेरणा दिवस
भारतीय स्वांत्र्यलढ्यात आदिवासी क्रांतिवीर नेहमीच अग्रेसर होते. सिद्धू कान्हा, राणी गायडीनल्लू,  बिरसा मुंडा, राणी दुर्गावती मडावी, राणा पुंजा भिल, खाज्या नाईक, झलकारी बाई, तंट्या मामा, राघोजी भांगरे, भीमा नाईक, नंदुरबार जिल्ह्यातील  किरसिंग भील,  रुमाल्या नाईक असे अगणित नावे समोर येतात.
इ.स.  सन १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी क्रांतिवीर देखिल मागे नव्हते त्याच्यातील खाज्या नाईक एक धुरंदर नेतृत्व सातपुडा परिसरामध्ये इंग्रजांविरुद्ध लाखो आदिवासी स्त्री,  पुरुष तरुणांना घेऊन इंग्रजांशी दगड,  कुर्‍हाडे, गोफण, भाला घेऊन लढत होते. खाज्या नाईक हे  इंग्रजांच्या पोलीस खात्यात नोकरी करत होते.  कलेक्टर मेन्सफिल्ड याने सेंधवा ते शिरपूर या ४० मैल च्या रस्त्यावर त्यांची नेमणूक केली होती. खाज्या नाईक प्रामाणिकपणे वीस वर्षे काम केले. परंतु  एकेदिवशी गुन्ह्याचा तपास करण्याच्या कामात त्यांच्या हातून एक गुन्हेगाराच्या कबुली जवाब घेताना गुन्हेगार मारला गेला. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना दहा वर्षाची शिक्षा दिली.  जेलमध्ये खाज्या नाईक यांची वागणूक चांगली असल्यामुळे पाच वर्षाची शिक्षा माफ करण्यात आली आणि ई स. १८५५  झाली त्यांना पुन्हा सोडण्यात आले.  १८५७ मध्ये खाज्या नाईक यांची सेंधवा ते शिरपूर घाटात पुन्हा नेमणूक करण्यात आली पण  स्वातंत्र्याचा आणि आदिवासी, पारंपरिक जीवनावर होणारे विविध घटना डोळ्यासमोर येत असल्याने नोकरी सोडून स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले.
भीमा नाईक, कालू बाबा,  बालू रावत असे अनेक साथीदार त्यांना मिळाले. भीमा नाईक आणि खाज्या नाईक यांनी शिरपूरला संयुक्तपणे २९ ऑक्टोबर १८५७ रोजी हल्ला केला. त्यात एक हजार पाचशे आदिवासींनी  भाग घेतला होता. इंग्रज कॅप्टन याने त्यांच्या ५६  किलोमीटर पाठलाग गेला. परंतु त्याला काही हाती लागले नाही. पुन्हा  १ ऑक्टोंबर १८५७ ला खाज्या नाईक,  भीमा नाईक यांनी इंग्रज सरकारच्या कलेक्टरच्या नाका जवळून लूट करून कमालच केली. तेव्हापासून पुन्हा कलेक्टरांना चांगली जरब बसला.१७ नोव्हेंबर १८५७ पर्यंत इंग्रजांविरुद्ध लढ्यासाठी  खाजा नाईक यांनी स्त्री-पुरुष तरुण असे करून १५०० आदिवासींची  मोठी तुकडी तयार केली होती आणि इंग्रजांच्या विरोधात लढत होते. त्यावेळच्या खानदेशच्या हद्दीपासून तीस मैलावर उत्तरेस होळकरांच्या हद्दीतल्या जामली चौकीजवळ इंदोरहून मुंबईकडे जाणारा सात लाखांचा खजिना बैलगाडीतून जात होता. तो त्यांनी लुटला आणि ब्रिटिश सत्तेला जबरदस्त आव्हान दिले.  त्या काळात खाज्या नाईक यांचे घर सेंधवा येथे होते. ११ एप्रिल १८५७ इंग्रांविरुध्द मोठी लढाई सुरू होती. हा अंबापाणी संग्राम इतिहासात अजरामर आहे.  खाज्या नाईक, दौलतसिंग नाईक, नाईक भीमा नाईक यासारखे क्रांतिकारी साथीदार एकत्रित झाले होते. डोंगराच्या शिखरावर खडकाचा आश्रय घेऊन लढत होते. बंडखोर आदिवासींच्या स्त्रियादेखील या लढाईमध्ये मागे नव्हते. या लढ्यात अनेक आदिवासी शहीद झाले.  काहींना  जिवंत पकडून त्यांना लष्करी डोल वाजून गोळ्या घालून ठार मारण्यात आले. या लढाईत खाज्या नाईकचा मुलगा दौलतसिंग मारला गेला. या  लढाईत ४६० क्रांतिवीर शहीद झाले होते. खाज्या नाईक यांची बायको भीमा नाईक यांचे पुतणे असे अनेक स्त्रिया होत्या. पुढे अनेक चकमकीनंतर खाज्या नाईक इंग्रजांच्या हाती लागले तेव्हा इंग्रजांनी खाज्या नाईक यांचे डोके कापून लिंबाच्या झाडाला आठ दिवस टांगून ठेवले होते.  अशा या भारतीय इतिहासातील थोर क्रांतीविरांची शहीद दिवस तारीख निश्चित नाही पण ११ एप्रिल १८५८ रोजी आंबापाणी स्वातंत्र्य संग्रामात ४६०० आदिवासी क्रांतिवीर शहीद झाले. निमित्ताने १२ एप्रिल रोजी सातपुडा परिसरात या दिवसाला क्रांतिवीर बहादूर खाज्या नाईक प्रेरणा दिवस म्हणून साजरी करतात.
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
Previous Post

कानुबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

Next Post

नंदूरबार येथे खा.डॉ. हीना गावीत यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 65 लाभार्थ्यांना व 26 व्यक्तींना नवीन शिधापत्रिकेचे वितरण

Next Post
नंदूरबार येथे खा.डॉ. हीना गावीत यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 65  लाभार्थ्यांना व 26 व्यक्तींना नवीन शिधापत्रिकेचे वितरण

नंदूरबार येथे खा.डॉ. हीना गावीत यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 65 लाभार्थ्यांना व 26 व्यक्तींना नवीन शिधापत्रिकेचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add