Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे खा.डॉ. हीना गावीत यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 65 लाभार्थ्यांना व 26 व्यक्तींना नवीन शिधापत्रिकेचे वितरण

team by team
April 12, 2022
in राजकीय
0
नंदूरबार येथे खा.डॉ. हीना गावीत यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 65  लाभार्थ्यांना व 26 व्यक्तींना नवीन शिधापत्रिकेचे वितरण

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथील तहसील कार्यालयात आज आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 65 लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचा धनादेश व 26 व्यक्तींना नवीन शिधापत्रिकेचे वितरण खा. डॉ. हीना गावीत आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले.

नंदूरबार येथील तहसील कार्यालयात आज दि.12 एप्रिल रोजी राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत धनादेश व नवीन शिधापत्रिकेचे वितरण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा. हीना गावित, आ.डॉ.विजयकुमार गावित, संजय गांधी योजना तालुका स्तरीय समिती सदस्य श्रीमती रंजनाबाई नाईक, इक्बाल खाटीक, भास्कर पाटील व रविंद्र पठाडे उपस्थित होते.
यावेळी
खा. डॉ. हीना गावीत आ.डॉ.विजयकुमार गावित व मान्यवरांच्या हस्ते एकूण 65 लाभार्थ्यांना प्रत्येकी 20 हजार रुपयांचा धनादेश राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत वितरित करण्यात आले.
दारिद्र रेषेखालील कुटुंबातील वय वर्षे 18 ते 60 वयोगटातील कर्ता व्यक्ती गमावल्यानंतर त्याचे वारसांना सदर अनुदान वितरित करण्यात येते.
तसेच यावेळी तालुक्यातील घुलि या गावातील 26 व्यक्तींना नवीन शिधापत्रिका वितरित करण्यात आल्या. यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी प्रास्ताविक मध्ये मार्च 22 मध्ये शासनाकडून निधी प्राप्त झाल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना धनादेश वितरण करणे शक्य झाल्याचे नमूद करून सर्व लाभार्थी यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले.
यावेळी आ. डॉ.विजयकुमार गावित यांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घरकुल योजनेचा देखील लाभ घ्यावा असे आवाहन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष खा.डॉ. हीना गावित यांनी सर्व पात्र लाभार्थी यांनी उज्वला गॅस योजनेअंतर्गत अर्ज करावा असे देखील आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार नितीन पाटील यांनी केले तर आभार नायब तहसीलदार रमेश वळवी यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

क्रांतिवीर बहादूर खाज्या नाईक प्रेरणा दिवस

Next Post

उन्हामुळे वृध्दाला आली चक्कर; चोरटयांनी लांबविले दिड लाखाचे ब्रेसलेट

Next Post
तऱ्हाडी ते परिवर्धा रस्त्यावर ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

उन्हामुळे वृध्दाला आली चक्कर; चोरटयांनी लांबविले दिड लाखाचे ब्रेसलेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add