Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

team by team
July 11, 2026
in शैक्षणिक
0
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार येथील एस ए मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या फुटबॉलपटूंनी जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत घवघवित यश संपादन केले आहे. शाळेच्या १७ वर्षांखालील (U-17) मुलांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप’वर आपले नाव कोरले तर १५ वर्षांखालील (U-15) मुलांच्या संघाला अटीतटीच्या सामन्यात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

१७ वर्षांखालील मुलांच्या संघाने स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच मैदानावर आपले वर्चस्व राखले. या संघाचा विजेतेपदाचा प्रवास खालीलप्रमाणे राहिला: पहिली मॅच (प्री-क्वार्टर फायनल) मिशन हायस्कूलने नवबौद्ध संघाचा ५-० अशा मोठ्या फरकाने पराभव केला. दुसरी मॅच (क्वार्टर फायनल) के. आर.पब्लिक स्कूलविरुद्ध खेळताना मिशनच्या संघाने १-० ने विजय मिळवला.
तिसरी मॅच (सेमीफायनल) शहादा चावरा संघाविरुद्धचा सामना अत्यंत चुरशीचा झाला. पेनल्टी स्ट्रोकमध्ये मिशन हायस्कूलने १-० ने बाजी मारत फायनलमध्ये धडक दिली.
चौथी मॅच (फायनल) अंतिम सामन्यात पी. जी. पब्लिक स्कूलचे तगडे आव्हान होते. मात्र, मिशनच्या मुलांनी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत ५-४ अशा गोलफरकाने हा सामना जिंकला आणि सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कपवर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयामुळे मिशन हायस्कूलचा १७ वर्षांखालील मुलांचा फुटबॉल संघ आता धुळे येथे होणाऱ्या विभागीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

१५ वर्षांखालील मुलांच्या संघानेही स्पर्धेत चांगली झुंज दिली. क्वार्टर फायनलमध्ये त्यांनी ‘खापर येथील इरा इंटरनॅशनल संघाचा ५-० ने धुव्वा उडवला. सेमीफायनलमध्ये ‘के. आर.’ संघाविरुद्धचा सामना पेनल्टी स्ट्रोकपर्यंत गेला, ज्यात मिशनने ३-२ असा विजय मिळवून फायनल गाठली.अंतिम सामन्यात ‘अहिंसा इंटरनॅशनल’ संघाविरुद्ध खेळताना मिशन हायस्कूलला ०-१ अशा निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मिशन हायस्कूलच्या या दैदिप्यमान यशामुळे शाळेसह संपूर्ण जिल्ह्यातून खेळाडूंचे अभिनंदन होत आहे. शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी, उपप्राचार्य विजय पवार, पर्यवेक्षक वंदना जांबिलसा आणि पर्यवेक्षक मीनलकुमार वळवी यांनी विजयी खेळाडूंची पाठ थोपटत त्यांच्यावर कौतुकाची थाप टाकून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या यशस्वी संघाला शाळेचे क्रीडाशिक्षक मिनलकुमार वळवी, सतीश सदाराव, शारदा पाटील आणि खुशाल शर्मा यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या यशामुळे धुळे येथील आगामी विभागीय स्पर्धेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

Next Post

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

Next Post
इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add