नंदुरबार l प्रतिनिधी-
पथराई ता. नंदुरबार येथील के. डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात इको क्लबच्या वतीने ‘एक पेड माँ के नाम’ या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य शरद पाटील व इको क्लब सदस्य,विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प करत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.
यावेळी विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून वृक्षारोपणाचे महत्त्व, पर्यावरण संवर्धनाची गरज आणि प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असा प्रभावी संदेश दिला.
या कार्यक्रमाचे नियोजन रोहित पाटील, कैलास पाटील आणि काशिनाथ सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.उपस्थितांनी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची शपथ घेत पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय सहभाग नोंदविला.







