Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कानुबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

team by team
April 12, 2022
in सामाजिक
0
कानुबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील
वडाळी येथे कानुबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आकिला. दि.10 एप्रिल रविवारी कानुमातेजवळ बाहेरो लग्नाचा कार्यक्रम संपन्न झाला तर दि.11 एप्रिल सोमवारी कानुमातेची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

वडाळी येथील सुशिलाबाई माळी, रमेश माळी व देविदास माळी यांच्या घरी कानुमाता उत्सव व बाहेरो लग्नाचा योग आला होता. यानिमित्त 17 मार्च ते 11 एप्रिल या काळात सलग आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बाहेरो लग्न सोहळ्यात नऊ जोडप्याचे लग्न लागले, सोमवारी कानुबाई मातेच्या विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली. दुपारी एक वाजेपर्यंत बँडच्या धूमधडाक्यात व प्रत्येक गल्लीत नळाच्या पाण्याच्या फवाऱ्यात कानुमातेच्या विसर्जन मिरवणुकीत भाविकांनी विविध पारंपरिक गाण्यांवर खान्देशी नृत्यावर ठेका धरत नृत्य केले. सोबतच फुगड्यांचा खेळ खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला. कृत्रिम पाण्याचा वापर करून कानुबाई मातेचा विसर्जन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. विसर्जन सोहळ्याप्रसंगी गावाची ईडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे, कोरोनाच सावट टळू दे, पावसाचे आगमन वेळेवर होऊ दे. अशी आराधनाही कानुमातेला भाविकांनी, शेतकऱ्यांनी केली. गावातील माळीवाडा, चौधरी गल्ली, माळी मढी, बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवाजी नगर तसेच गावाचे प्रवेशद्वार, ग्रामदेवता भवानीमाता चौक आदी विविध चौकातून कानुबाई मातेची विसर्जन मिरवणूक काढली. अखेर दुपारी तापी नदी पात्रात कानुबाई मातेचे विधिवत विसर्जन करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

वैरणीकरिता शेवगा लागवडीसाठी अनुदान उपलब्ध

Next Post

क्रांतिवीर बहादूर खाज्या नाईक प्रेरणा दिवस

Next Post
क्रांतिवीर बहादूर खाज्या नाईक प्रेरणा दिवस

क्रांतिवीर बहादूर खाज्या नाईक प्रेरणा दिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add