नंदुरबार l प्रतिनिधी-
कोपर्ली ता. नंदुरबार येथील नं. ता.वि. स.संचलितएस.आर.सी. इंदाणी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत एकूण १२ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.
इयत्ता पाचवी मधून ऐश्वर्या पाटील ही विद्यार्थिनी शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे. आठवीतील मधून अतुलसिंग राउळ, भूमी पाटील, भूमिका पाटील, धम्मदीप भामरे, धिरज कोळी, दिव्या कुंभार, फरहान पिंजारी, जयेश कोळी, रूचिता पाटील, साजिया पिंजारी व योगेश राजपूत हे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन व आमदार चंद्रकांत रघुवंशी, व्हा. चेअरमन मनोज रघुवंशी, संस्थेचे सचिव बी.के.पाटील, कार्यालयीन अधिक्षक पुष्पेंद्र रघुवंशी, विद्यालयाचे प्राचार्य व्ही.के.पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आनंद व समाधान व्यक्त केले.







