नंदूरबार l प्रतिनिधी
१५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश राजवटीतुन भारत मुक्त होऊन भारताला स्वातंत्र्य मिळाले होते . यावर्षी भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असून अमृत महोत्सवी भारत हा उपक्रम महाराष्ट्रासह संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे . म्हणून अमृत महोत्सवी भारत उपक्रम अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजीत केले जात आहे . नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील व अपर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री . विजय पवार यांचे उपस्थितीत अमृत महोत्सवी भारत या उपक्रमाचे औचीत्य साधून नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरीकांना नविन वर्षानिमीत्त शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम शिवाजी चौक , नंदुरबार येथे आयोजीत करण्यात आला होता .

कोरोना नियमांचे पालन करून नविन वर्षानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस बँड पथकातील पोलीसांनी बॅड वाजविण्याचा कार्यक्रम करुन नागरीकांना शुभेच्छा दिल्या . त्याच बरोबर नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील व अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विजय पवार यांचे प्रमुख उपस्थितीत नंदुरबार शहरात बँड पथकासह संचलन करण्यात आले . सदरचा कार्यक्रम योग्य ती परवानगी घेऊनच आयोजीत करण्यात आला होता . अमृत महोत्सवी भारत या उपक्रमाचे औचीत्य साधून नविन वर्षांच्या शुभेच्छांसह ४०० नागरीकांना पोलीसांतर्फे मास्क देखील वाटप करण्यात आले.तसेच नागरीकांना शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणार्या मार्गदर्शक सूचनांचे महत्व सांगून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पून्हा एकवेळा झपाट्याने वाढत असून काळजी घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या . सदर कार्याक्रमाच्या वेळी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील व अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विजय पवार , उप विभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार विभाग सचिन हिरे , नंदुरबार तहसिलदार भाऊसाहेब थोरात , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव , नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर , नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार , उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे , शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भावसार , इतर अधिकारी अमंलदार व जिल्ह्यातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते .








