Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमीत्त पोलीस दलातर्फे नागरीकांचे अनोखे स्वागत, पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांची नंदुरबार जिल्हावासीयांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा

team by team
January 1, 2022
in राज्य
0
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमीत्त पोलीस दलातर्फे नागरीकांचे अनोखे स्वागत, पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील यांची नंदुरबार जिल्हावासीयांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा

नंदूरबार l प्रतिनिधी

१५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश राजवटीतुन भारत मुक्त होऊन भारताला स्वातंत्र्य मिळाले होते . यावर्षी भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असून  अमृत महोत्सवी भारत हा उपक्रम महाराष्ट्रासह संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे . म्हणून  अमृत महोत्सवी भारत  उपक्रम अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजीत केले जात आहे . नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील व अपर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री . विजय पवार यांचे उपस्थितीत अमृत महोत्सवी भारत या उपक्रमाचे औचीत्य साधून नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरीकांना नविन वर्षानिमीत्त शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम शिवाजी चौक , नंदुरबार येथे आयोजीत करण्यात आला होता .

कोरोना नियमांचे पालन करून नविन वर्षानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस बँड पथकातील पोलीसांनी बॅड वाजविण्याचा कार्यक्रम करुन नागरीकांना शुभेच्छा दिल्या . त्याच बरोबर नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील व अपर जिल्हा पोलीस अधीक्षक  विजय पवार यांचे प्रमुख उपस्थितीत नंदुरबार शहरात बँड पथकासह संचलन करण्यात आले . सदरचा कार्यक्रम योग्य ती परवानगी घेऊनच आयोजीत करण्यात आला होता .  अमृत महोत्सवी भारत  या उपक्रमाचे औचीत्य साधून नविन वर्षांच्या शुभेच्छांसह ४०० नागरीकांना पोलीसांतर्फे मास्क देखील वाटप करण्यात आले.तसेच नागरीकांना शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणार्‍या मार्गदर्शक सूचनांचे महत्व सांगून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पून्हा एकवेळा झपाट्याने वाढत असून काळजी घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या . सदर कार्याक्रमाच्या वेळी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील व अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विजय पवार , उप विभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार विभाग  सचिन हिरे , नंदुरबार तहसिलदार  भाऊसाहेब थोरात , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर , जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव , नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  किरणकुमार खेडकर , नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार , उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  नरेंद्र भदाणे , शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भावसार , इतर अधिकारी अमंलदार व जिल्ह्यातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते .
बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्हात आज पुन्हा आढळले तीन कोरोना रुग्ण, दोन दिवसात आढळले 6 रुग्ण

Next Post

बॅँकेची साडेचार लाखात फसवणूक केल्याप्रकरणी एका विरूध्द गुन्हा

Next Post

बॅँकेची साडेचार लाखात फसवणूक केल्याप्रकरणी एका विरूध्द गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add