Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दरमहा लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरण बंधनकारक : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

team by team
January 17, 2025
in राज्य
0
दरमहा लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरण बंधनकारक : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

नंदुरबार l प्रतिनिधी-

जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांना दरमहा नियमित अन्नधान्य वितरण सुनिश्चित करून ते वितरित करणे बंधनकारक असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा पुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ, सहायक पुरवठा अधिकारी गोपाल घडमोडे, हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस कंपनीचे नोडल अधिकारी तसेच तहसीलदार, पुरवठा निरीक्षक व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जिल्ह्यातील 100 टक्के आधार सिडींग पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. नंदुरबार जिल्ह्यातील धान्यवाटप सरासरी 90-91 टक्के असल्याने त्यांनी उर्वरित शिधापत्रिकांच्या तपासणीचे निर्देश दिले. तसेच, भारतीय अन्न महामंडळाने वेळेत अन्नधान्याचा पुरवठा करण्यावर भर दिला. गॅस जोडणी नसलेल्या कुटुंबांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी तहसीलदार आणि गॅस कंपन्यांना समन्वय साधण्याचे निर्देश दिले. प्रलंबित शिधापत्रिकांच्या मोबाईल सिडींग व ई-केवायसीसाठी गावोगावी कॅम्प आयोजित करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

डॉ. मित्ताली सेठी यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांना दरमहा अन्नधान्य वितरण बंधनकारक आहे. लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरणात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रास्तभाव दुकानदारांनी जबाबदारीने काम करावे. जर कोणत्याही दुकानदाराने अन्नधान्य वितरणात टाळाटाळ केली तर नागरिकांनी तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक 02564-210009 किंवा जिल्हा कार्यालयाच्या dso.nandurbar@gmail.com ई-मेलवर तक्रार दाखल करावी, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सेठी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्य क्रीडा दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान : सुनंदा पाटील

Next Post

स्वामित्व योजनेत जिल्ह्यात 29 गावांना आज सनद वितरण, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत होणार कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add