नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभेतील चार मतदार संघात 2 भाजपा , काँग्रेस एक शिंदे सेना यांचा विजय झाला आहे.
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात शिंदे शिवसेनेचे आमश्या पाडवी 4800 मतांनी विजयी झाले.तर शहादा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे राजेश पाडवी 52 हजार 743 मतांनी विजयी झाले.नंदुरबार विधानसभा मतदारसंघात डॉ. विजयकुमार गावित 76 हजार 285 मतांनी विजयी झाले.
नवापूर विधानसभेत काँग्रेसचे शिरीषकुमार नाईक 1 हजार 121 मतांनी विजयी झाले.