नंदुरबार l प्रतिनिधी-
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश आलेले दिसून आले. 288 पैकी 235 जागांवर युतीने विजय मिळवला. असे असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. महायुतीतर्फे अद्याप मुख्यमंत्री नेमका कोण असणार आहे याबाबत घोषणा करण्यात आलेली नाही. तीनही पक्षांचे समर्थक आपलाच मुख्यमंत्री होईल याबाबत चर्चा करताना दिसत आहेत. मात्र नंदुरबार मध्ये लाडक्या बहिणींचा लाडका मुख्यमंत्री देवाभाऊ असे 20 बाय 50 चे भले मोठे बॅनर फडकली आहे. शहरातील नागरिकांचे हे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत.
महायुतीला विधानसभेत राज्यातील जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. 132 जागांवर भाजपा, शिंदे शिवसेनेला 57 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 41 विजय मिळाला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी नेमका कुठला फॉर्मुला ठरतो ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र मुख्यमंत्री म्हणून भाजपातर्फे देवेंद्र फडणवीस तर शिंदे शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे नाव यांचे नाव आघाडीवर आहे.
वरिष्ठ स्तरावर स्तरावर मुख्यमंत्री पदाच्या नावाची चर्चा सुरू असताना. नंदुरबार शहरातील मध्यवर्ती ठिकाणावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे भले मोठे बॅनर फडकले आहे.लाडक्या बहिणींचा लाडका मुख्यमंत्री देवाभाऊ असा आशय असलेला वीस बाय पन्नास फुटाचे बॅनर लावण्यात आलेले आहे. भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी तसेच नंदुरबार भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी हे बॅनर लावले आहे.आहे.लाडक्या बहिणींचा लाडका मुख्यमंत्री देवाभाऊ या बॅनरची जिल्हाभर चर्चा सुरू आहे.