नंदुरबार l प्रतिनिधी-
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार तर्फे मे महिन्यात दोन वेगवेगळ्या भव्य पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश वाघ यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
*पहिला मेळावा: 19 मे 2026 (भालेर)*
• जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार आणि काकेश्वर विद्याप्रसारक संस्था, श्रीमती कमलाताई पुरुषोत्तम पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भालेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित.
• *स्थळ:* श्रीमती कमलाताई श्रीपुरुषोत्तम पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भालेर (ता. जि. नंदुरबार)
• *वेळ:* सकाळी 10-00 वाजता.
• *एकूण रिक्तपदे:* 745 पेक्षा जास्त.
• *प्रमुख कंपन्या:* अदाणी सोलार प्लांट (कच्छ), अस्तिमो इंडिया, लिग्रॅम, छबी इलेक्ट्रिकल्स, रेमंड (सर्व जळगांव), लुसी जे. के. मैनी (नाशिक), नवभारत फर्टिलाइजरर्स (धुळे), एन.सी.सी लिमिटेड (नंदुरबार), आणि बोस्च (नाशिक व पुणे)
*दुसरा मेळावा (प्लेसमेंट ड्राईव्ह): 21 मे 2026 (नंदुरबार शहर)*
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर (छत्रपती संभाजीनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष प्रशिक्षण व भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे.
• *स्थळ:* एम. के. डी. कॉलेज, वीरचक नदी जवळ, नवापूर रोड, नंदुरबार.
• *वेळ:* सकाळी 10-00 वाजता.
• *वयोमर्यादा:* केवळ 18 ते 21 वर्षे.
• *शैक्षणिक पात्रता:* किमान 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण, किंवा बी.ए. (B.A.) / बी.कॉम (B.Com) चे शिक्षण घेणारे.
• *विशेष नोंद:* आयटीआय, डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगचे विद्यार्थी यासाठी पात्र नाहीत.
• *विद्यावेतन (Stipend):* प्रथम वर्ष 15 हजार 815 रुपये प्रति महिना, तर द्वितीय वर्ष 17 हजार 615 रुपये प्रति महिना.
• *इतर सुविधा:* राहण्याची व जेवणाची व्यवस्था, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वॉर्डनची देखरेख असेल.
• *अधिक माहितीसाठी :* जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्र किंवा टोयोटा किर्लोस्कर मोटरचे प्रतिनिधी रंजित पाटील यांच्याशी, तसेच 8208320610 या क्रमांकावर संपर्क साधावा.
जिल्ह्यातील सर्व पात्र तरुणांना या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असेही आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. वाघ यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.








