Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

team by team
May 16, 2026
in राजकीय
0
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या विशेष प्रयत्नातून नंदुरबार तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींना पाणी टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी 13 ग्रामपंचायतींना संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण दिनांक 15 मे 2026 रोजी करण्यात आले.

*मी लवकरच परततोय; साहेबांचा कार्यकर्त्यांना दिलासा*

या प्रसंगी माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी व्हिडिओ कॉल द्वारे उपस्थित सर्व सरपंच उपसरपंच आणि कार्यकर्ते यांना संबोधित केले. संबोधित करताना त्यांनी सांगितले की, तीव्र उन्हामुळे अनेक गावात टंचाई निर्माण होते हे लक्षात घेऊन पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्रामस्थांना त्यामुळे पाण्याची सोय होईलच तथापि गुरांची आणि शेतीची गरज भागेल या दृष्टिकोनातून शासनाने ही सुविधा करून दिली आहे. म्हणून प्रत्येक गावाने त्याचा सदुपयोग करून घ्यावा असे आवाहन करून डॉक्टर विजयकुमार गावित यांनी ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या. आता बरा होऊन मी रुग्णालयातून मुंबई येथील घरी सुखरूप परतलो आहे. येत्या दोन-तीन आठवड्यांनी प्रत्यक्ष नंदुरबार येथे लवकरच येईन आणि आपल्या सर्वांसमवेत कार्यरत होईल, असे देखील याप्रसंगी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी ठणठणीतपणे सांगितले. त्यांचा ठणठणीतपणा पाहून उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त केला.

*साहेबांनी भेदभाव न करता लाभ दिले: डॉ हिना गावित*

दरम्यान, डॉक्टर हिनाताई गावित यांनी संबोधित करताना सांगितले की, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला आणि गावांना डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला. विकास काम आणि योजना देताना त्यांनी कधीही भेदभाव केलेला नाही. पाणीटंचाईचा प्रश्न सोडवताना देखील त्यांनी विरोधी पक्षाचे की आपल्या पक्षाचे असे बघितले नाही, असे नमूद करून डॉक्टर हिना पुढे म्हणाल्या की, टँकरचा सदुपयोग करताना मानवतेच्या भूमिकेतून जे जे गरजू लोक असतील त्यांना प्राधान्याने पाणी पुरवण्याचे काम करावे. पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी शासन प्रशासन स्तरावर आपण सातत्याने प्रयत्नशिल राहून पाठपुरावा करीत राहणार आहे.

आज नंदुरबार तालुक्यातील उमर्दै बु., धामडोद, भिलाईपाडा, कंद्रे, शिंदे, पळाशी, खोक्राळे, वळवद, बामडोद, कलमाडी, जुनमोहिदे, कानळदे,घोटाणे या ग्रामपंचायतींना टँकर वितरित करण्यात आले. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पाटील, संस्था अध्यक्ष युवराज पाटील, माजी सरपंच लोटन पाटील यांच्यासह नंदुरबार तालुक्यातील विविध गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील बलवंड होळ तर्फे रनाळे वैंदाने आसाने मांजरे रजाळे खोंडामळी कोळदा शनिमांडळ या गावांना यापूर्वीच पाण्याचे टँकर वितरित करण्यात आले आहे

बातमी शेअर करा
Previous Post

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

Next Post

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

Next Post
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026
भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

August 20, 2026
महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

August 20, 2026
तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा:  आ.चंद्रकांत रघुवंशी

तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा: आ.चंद्रकांत रघुवंशी

August 16, 2026
भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add