नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील प्रभाग क्र. १ मधील बेथेल कॉलनीमधील मुख्य रस्त्याचे नूतनीकरण तसेच जीर्णवस्था झालेल्या सार्वजनिक शौचालयाचे नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. या दोन्ही विकासकामांचे भूमिपूजन आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील बेथेल कॉलनीत अनेक दिवसांपासून रस्त्यांवर खड्डे पडलेले होते. त्यामुळे परिसरातील रहिवासी व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. परिसरात शैक्षणिक संस्था असल्यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना देखील रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास होत होता. त्याचप्रमाणे शौचालयाची देखील जीर्णवस्था झाली होती. प्रभागातील नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे व नगरसेविका ज्योती राजपूत यांनी आ.चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांना सदरील बाब निदर्शनास आणून देत उपायोजना करण्याचे सुचविले होते.
आ.चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांना प्रभागातील नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी बेथेल कॉलनीत तात्काळ नवीन रस्ता व शौचालय बांधकामाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. पालिकेत तसा ठराविक करण्यात आला होता. शुक्रवारी सायंकाळी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते नवीन रस्ता व शौचालय बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,नगरसेवक कुणाल वसावे,नगरसेविका ज्योती राजपूत, माजी नगरसेवक शत्रुज्ञ बालानी, नगरसेवक दीपक कटारिया,नगरसेवक गौरव चौधरी,कमल ठाकूर,योगेश राजपूत,शीतल पटेल,जितेंद्र मराठे, भूषण नेरे,सेवा फाउंडेशनचे भारत भूषण, युवा सेना पदाधिकारी अमर वळवी तसेच बेथेल कॉलनीतील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







