नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातून जाणाऱ्या वळण रस्त्यावर दररोज वाळू वाहतूक करणारे डंपर आणि ट्रक या जड वाहनांची वर्दळ वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने गंभीरतेने दखल घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे व गतीरोधक बसविण्याची मागणी नंदुरबार जिल्हा प्रोफेशनल फोटोग्राफर असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,एक आठवड्यापूर्वी एका सायकलस्वार शालेय विद्यार्थिनींचा आणि त्यानंतर दुचाकीस्वार फोटोग्राफर युवकाचा अपघातात बळी गेला. यामुळे जनतेमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या जड वाहनांच्या अति वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे नवापूर चौफुली, दंडपाणेश्वर मंदिर, मिराज सिनेमा, कल्याणेश्वर गणपती मंदिर, वीरशैव लिंगायत गवळी समाज स्मशानभूमी, धुळे चौफुली, जाणता राजा चौक, छत्रपती हॉस्पिटल, जगतापवाडी, उड्डाणपूल, करण चौफुली, जिजामाता महाविद्यालय, सीबी पेट्रोल पंप, जोगनी माता मंदिर जवळ आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि गतिरोधक बसवावे तसेच संपूर्ण वळण रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ते दुरुस्त करण्यात यावे. तसेच वाळू डंपर आणि ट्रक या जड वाहतुकीच्या वेळेत बदल करण्यात यावा. रात्रीच्या वेळी मार्गस्थ करण्याबाबत जिल्हा प्रशासनातर्फे आदेशित करावे. या उपायोजनांमुळे भरधाव वेगातील वाहनांवर नियंत्रण बसेल आणि संभाव्य अपघात टाळणे शक्य होईल.
या महत्वपूर्ण आणि अत्यंत आवश्यक मागणी संदर्भात आरटीओ,सार्वजनिक बांधकाम विभाग, शहर वाहतूक शाखा, पोलीस विभाग, नंदुरबार नगर परिषद यांना पत्र देऊन आदेशित करावे अशी मागणी नंदुरबार जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल निकुंभे, माजी अध्यक्ष राकेश तांबोळी, संदीप महाजन,गोविंद अग्रवाल, महादू हिरणवाळे,नितीन पाटील,
सुनील कुलकर्णी, गणेश पारेख, मयूर चौधरी, पियुष सोनार, कांतीलाल जावरे, विष्णू रामचंदाणी,मनोज उचलाणी, गिरीश पाटील, कपिल पाटील, रवींद्र पाटील, गणेश पाटील, रवींद्र पाटील, पंकज सोनवणे, रोहित गांगुर्डे, पुष्पेन्द्र राजपूत, चेतन यादव, समाधान पाटील, पंकज पाटील, सचिन मराठे, अश्विन बनछोड, किरण गोंधळी, दीपक सोनार, निहाल ठाकूर, दीपक अहिरे, जगदीश चव्हाण, तुषार पाटील, वैभव थोरात, मयूर मराठे, योगेश पाटील, संतोष चित्ते, आदी छायाचित्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.