नंदुरबार l प्रतिनिधी
सुमारे पावणेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या नंदुरबार येथील होलिकोत्सवातील जगदंबादेवी अवतार मुखवटा मिरवणूक आज शनिवारी सायंकाळी सात वाजेला शिवाजी चौकातील कमानी दरवाजापासून प्रारंभ होईल.
मांगल्य सेवा संस्था तर्फे आयोजित या मिरवणुकीसाठी प्रतिवर्षी ग्राम जोशी भास्करराव जोशी यांच्या निवासस्थानापासून जगदंबा देवी अवतार मिरवणुकीस प्रारंभ होईल. त्यानंतर शिवाजी चौक होळी, जुने मधुरम हॉस्पिटल येथे व्यासपीठावर दर्शन, त्यानंतर जळका बाजार, पोस्ट गल्ली, नगरपरिषद टावर,टिळक रोड,
शिरीष मेहता रोड, सराफ बाजार, फडके चौक, गुळवाडी, बालाजी वाडा, सोनार खुंट, संकट मोचन मारुती चौक, विठ्ठल मंदिर, तसेच गणपती मंदिर या ठिकाणी रात्री दहाच्या सुमारास जगदंबा देवीच्या मिरवणूकचा समारंभ होईल. वर्षं वर्षापासून सुरू असलेल्या परंपरेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मांगल्य सेवा संस्थांतर्फे करण्यात आले आहे.