Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नागरीक तुम्हाला महसुल देतात, नगरपालिकेचे सुखसोयी उपलब्ध करुन देणे आवश्यक : भाजपा तालुका अध्यक्ष भरत गावीत 

team by team
January 14, 2023
in राजकीय
0
नागरीक तुम्हाला महसुल देतात, नगरपालिकेचे सुखसोयी उपलब्ध करुन देणे आवश्यक : भाजपा तालुका अध्यक्ष भरत गावीत 
नवापूर l प्रतिनिधी
येथील नगरपालिकेने लाईट बाजार भागात व्यापाऱ्यांना अतिक्रमण काढण्याबाबतच्या नोटिसा बजावल्या आहेत या अनुषंगाने आज नवापूर नगरपालिकेच्या एकलव्य सभागृहात भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष भरत गावित यांच्या नेतृत्वात व्यापारी वर्गांची बैठक घेण्यात आली.
 या बैठकीत मुख्याधिकारी स्वप्निल मुंदलवाडकर ,पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, वीज अभियंता हेमंत बनसोड,तालुका आरोग्य अधिकारी मनीषा वळवी आदी उपस्थित होते. यावेळी ज्या व्यापाऱ्यांना नवापूर नगरपालिकेने अतिक्रमण काढण्याबाबतचे नोटिसा दिल्या आहेत त्यांनी आपले म्हणणे मुख्याधिकारी यांच्यासमोर मांडले यावेळी सर्व व्यापारी वर्गांच्या म्हणणे ऐकून मुख्याधिकारी स्वप्निल मुदलवाडकर म्हणाले की, नागरीकांना आम्हाला विश्वासात घेऊन काम करायचे आहे,पार्कीगची समस्या अवघड झाली आहे.याबाबत बऱ्याच तक्रारी नागरीकांनी आमचा जवळ केल्या आहेत.वन वे पार्कीग करण्याचे सुचना ही काही नागरीकांनी केल्या आहेत.या बाबत आम्ही जिल्हा पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्याशी बैठक घेऊन या बाबत मार्ग काढण्याचा प्रयत्न करु.आम्ही ज्या लाईट बाजार भागातील अतिक्रमना बाबत नोटीसा दिल्या आहेत. त्या मध्ये स्पष्ट म्हटले आहे की.रस्ता रुंदीकरणा मध्ये जेथे जेथे अडथळा येत आहे.तेथे तुम्ही स्वताहुन अतिक्रमण काढुन घ्या.लोकसंख्या व वाहनांची संख्या वाढली असली तरी जागा तेवढीच आहे. त्यामुळे आपल्याला हे नियोजन करावे लागणार आहे.मी तुम्हाला आश्वासीत करतो कि घर ,इमारत पाडली जाणार नाही.रस्त्यावर एक दोन फुट ओटेचे काढण्यात येणार आहे.
या नंतर पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे म्हणाले की, आम्ही पोलिस विभागा तर्फे आश्वासीत करतो कि वाहतुकीच्या समस्येवर सक्तीने कारवाई करणार आहोत.यासाठी सर्व नागरीकांचे सहकार्य आम्हाला पाहीजे आहे.व्यापारी वर्गाला आमची विनंती आहे.संध्याकाळी ७ नंतर गावात वर्दळ कमी होते.त्यावेळी व्यापारी वर्गाने आपला मोठ्या वाहनातून माल उतरावा.दि १४ जानेवारी २०२३ पासुन बेशीस्त वाहणावर सक्तीने कार्यवाही आम्ही करणार आहोत यासाठी कोणत्याही नागरीकांनी आम्हाला संपर्क  करु नये.प्रत्येक दुकांनदार बांधवानी रस्त्यावर दुकानां समोर बोर्ड ठेऊ नये अन्यथा आम्ही त्यांच्यावर कार्यवाही करणार आहोत.
या नंतर भरत गावीत म्हणाले की, नवापूर शहराची लोकसंख्या वाढल्याने वाहणाचे प्रमाण वाढले आहे.यामुळे लाईट बाजार सह शहरातील मुख्यभागात ट्रॉफीकची समस्या वाढली आहे.यासाठी पोलिस प्रशासनाने चौका चौकात पोलिस कर्मचारी लावुन ही समस्या मिटवावी.तसेच वाहनतळ बनविण्याचा प्रयत्न न.पा प्रशासनाने केला पाहीजे.जडवाहणासाठी काहीतरी नियमावली लावली पाहीजे.लोखंडी पोल उभे केल्याने हा प्रश्न मार्गी लागणार नाही.आपण कुठे तरी नागरीकांना ञास देत आहोत.नागरीक तुम्हाला महसुल देत आहे.यासाठी नगरपालिकेचे सुखसोयी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.नागरीकांना माझी विनंती आहे रस्त्यावर आपले दुकांनाचे बोर्ड लाऊ नका यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.या नंतर एजाज शेख म्हणाले की १०० वर्षा पासुन वसलेले नवापूर शहरातील पहिला नेशनल हॉयवे हा लाईट बाजार रोड होता.या भागात पुर्वकाळ नागरीक राहत आहे.अशा नागरीकांचा घरावर सुध्दा नगरपालिकेने अतिक्रमणाची रेषा दाखवली आहे.माझा नगरपालिकेला प्रश्न आहे.लाईट बाजार भागात जे रस्त्याजवळ नविन इमारती बनल्या आहेत.नियम बाह्य बांधल्या गेल्या आहेत.त्यांना काय म्हणुन मान्यता दिली ,परवानगी दिली.त्याचा मुळे ट्रॉफीक समस्या निर्माण झाली आहे.या नंतर व्यापारी संघटनचे उपाध्यक्ष मंगेश येवले, राहुल मराठे,अँड प्रफुल दलाल,अँड नितिन देसाई,धृवेश अग्रवाल, सह अनेक व्यापारी वर्गाने आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार,सचिन अग्रवाल,अभियंता संदाशिव आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

डिसेंबर मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचा खर्च सादर न केल्यास होणार अपात्र

Next Post

शहादा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात . प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिश चौधरी यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार

Next Post
शहादा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात . प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिश चौधरी यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार

शहादा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात . प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिश चौधरी यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

April 18, 2026
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

April 18, 2026
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add