Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

team by team
July 18, 2026
in राजकीय
0
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

नंदुरबार l प्रतिनिधी-

राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे महिला व बाल रुग्णालयातील अत्याधुनिक स्पेशल नवजात अर्भक काळजी विभाग आणि मातृदूध बँकेचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत उभारण्यात आलेल्या या सुविधा नवजात बालके व मातांना गुणवत्तापूर्ण, सुरक्षित आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीस आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी, माजी खासदार डॉ, हिना गावित, माजी जिप अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ.कपिल आहेर, कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे,आदि संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा ३९ खाटांचे स्पेशल नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेच्या माध्यमातून अकाली, कमी वजनाच्या व गंभीर आजारी नवजात बालकांवर तज्ज्ञ उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे. मातृदूध बँकेमुळे गरजू नवजात बालकांना सुरक्षित व तपासणी केलेले स्तनदूध उपलब्ध होऊन त्यांचे आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होणार आहे.

उद्घाटनानंतर पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हा रुग्णालयात, जिल्हा सनियंत्रण व सल्लागार समिती, जिल्हास्तरीय पालक जन आरोग्य संरक्षण कार्यकारीणी समिती तसेच जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या बैठक झाल्या यावेळी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसह जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची जिल्हाभर व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्यात यावी, जेणेकरून पात्र लाभार्थ्यांना योजनेचा अधिकाधिक लाभ मिळेल, असे निर्देश दिले. तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व जिल्हा रुग्णालयातील रिक्त नर्सिंग पदे भरण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील नादुरुस्त प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींची दुरुस्ती तातडीने करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीत जिल्हा रुग्णालय, नेत्र रुग्णालय, महिला रुग्णालय, आयुष रुग्णालय, एमसीएच विंग, नर्सिंग कॉलेज व वसतिगृहासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्यवस्था उपलब्ध करून देणे, जिल्हा रुग्णालय परिसरात एमआरआय केंद्र स्थापन करणे तसेच जिल्हा रुग्णालय व निवासस्थान परिसरातील अंतर्गत रस्त्यांची कामे हाती घेणे या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या विषयांबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी बैठकीत दिल्या.
बैठकीच्या सुरुवातीला, ग्रामीण रुग्णालय धडगाव,उप रुग्णालय तळोदा व नवापूर येथील नवजात शिशु स्थिरीकरण कक्ष तसेच ग्रामीण रुग्णालय शहादा येथील शस्त्रक्रिया विभागाचे ऑनलाइन उद्घाटन पालकमंत्री श्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. बैठकीच्या शेवटी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेश पाडवी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी वाटपाचे तात्काळ नियोजन करावे: पालकमंत्री हसन मुश्रीफ

Next Post

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

Next Post
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add