Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

team by team
July 20, 2026
in राजकीय
0
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबार l प्रतिनिधी-

जिल्ह्यात अत्यल्प पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आला असून, पेरणी केलेली पिके कोमेजण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांच्या बियाण्याचा संपूर्ण खर्च राज्य शासन उचलणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

लोकनेते स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित ‘सेवा सप्ताह’ अंतर्गत नंदुरबार येथील संजय टाऊन हॉलमध्ये झालेल्या बूथ कार्यकर्ता (बीएलए) मेळाव्यात ते बोलत होते. पुढे श्री.मुश्रीफ म्हणाले की, राज्यात सर्वात कमी पाऊस नंदुरबार जिल्ह्यात झाला आहे. विशेषत: नंदुरबार आणि शहादा तालुक्यात पावसाअभावी परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली असली तरी पावसाने पाठ फिरवल्याने कापूस व सोयाबीनसह खरीप पिकांवर संकट ओढवले आहे. जर पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी शासन बियाण्याचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पिण्याच्या पाण्याच्या संभाव्य टंचाईचा विचार करुन प्रशासनासोबत नियोजन बैठक घेण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या बैठकीत नर्मदा खोऱ्यातील १० टीएमसी पाणी महाराष्ट्राच्या वाट्याला मिळाले असून, भविष्यात हे पाणी जिल्ह्यातील शेतकर्ऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात सुरु असलेल्या एसआयआर मोहिमेचा उल्लेख करत मुश्रीफ म्हणाले की, मतदार नोंदणीसाठी शासनाने २९ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक बूथ कार्यकर्त्यांने गावागावातील प्रत्येक मतदाराची नोंदणी पूर्ण करण्यासाठी जबाबदारीने काम करावे. नंदुरबार जिल्ह्यात जो पर्यंत मी पालकमंत्री असे पर्यंत राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा असल्याचे आश्वासीत केले. दरम्यान पुढे बोलतांना श्री. मुश्रीफ यांनी विविध माध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांच्या नेतृत्वात राष्टवादी स्व.अजित पावरांचे स्वप्न पुर्ण करणार असल्याचे सांगत संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. लोकनेते स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून, २२ ते २४ जुलैदरम्यान कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे म्हणाले की, राज्यात सेवा सप्ताह २२ जुलैपासून सुरू होत असला तरी नंदुरबार जिल्ह्यात १३ जुलैपासूनच विविध समाजोपयोगी उपक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. बूथ कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असून, एसआयआर नोंदणीसह आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय राहण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार कार्यकर्त्यांना देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेशी थेट सामना करण्यासाठी पक्ष सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या मेळाव्यास पक्षाच्या प्रवक्त्या प्रतिभा शिंदे, भरत गावित, जि.प.माजी सभापती रतन पाडवी, नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, जयवंत जाधव, योगेश चौधरी, माजी जि.जि.सदस्य मोहन शेवाळे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सिताराम पावरा, डॉ. सुरेश नाईक, महिला जिल्हाध्यक्ष सीमा सोनगीर, उपाध्यक्ष मधुकर पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

Next Post

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

Next Post
शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add