Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात . प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिश चौधरी यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार

team by team
January 14, 2023
in शैक्षणिक
0
शहादा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात . प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिश चौधरी यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार
  शहादा l प्रतिनिधी
  शहादा तालुका माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, वल्लभ विद्यामंदिर पाडळदा व शिक्षण विभाग पंचायत समिती शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२२-२३ समारोप व बक्षीस वितरण सोहळा अध्यक्ष दत्तात्रय सोमजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे नंदुरबार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, गटशिक्षणाधिकारी डी.टी वळवी, यांचा अध्यक्षतेखाली पार पडला.
अध्यक्षीय भाषणातून रमेश चौधरी ज्येष्ठ संचालक यांनी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी वैज्ञानिक क्षेत्रात वाढ करून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत असे आवाहन केले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्राथ. शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी विज्ञान शिक्षकांनी नवनवीन प्रयोग करावेत व नंदुरबार जिल्हा प्रगतीच्या दिशेने कशी वाटचाल कळेल या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण करून अवगत करावे तसेच वैज्ञानिक सी. व्ही.रमण यांच्या कार्याची माहिती दिली व संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ तसेच शाळेचे कौतुक करून गुणगौरव केला. व ज्येष्ठ संचालक रमेश चौधरी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
गटशिक्षणाधिकारी डी.टी. वळवी यांनी विज्ञान प्रदर्शनात भाग घेतलेल्या विद्यार्थी, शिक्षकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तसेच बक्षीस वितरण प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, गटशिक्षणाधिकारी डी. टी.वळवी, शिक्षण विस्तार अधिकारी ममता पटेल,शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल तावडे यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थी,  शिक्षकांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह  देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून प्राध्यापक डोळे , प्राध्यापक पी.व्ही साळुंखे, श्री.जावळे, मनोहर मिस्त्री, वासुदेव पाटील, वंदना पाटील यांनी काम पाहिले.
प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक नील प्रशांत पाटील शेट विकेशा विद्यामंदिर शहादा, द्वितीय क्रमांक सुभद्रा शिरीष कुमार पाटील व्हॅलंटरी प्राथमिक महिला मंडळ शहादा, तृतीय क्रमांक अन्वी संदीप लोखंडे महावीर इंग्लिश मीडियम शहादा, आदिवासी राखीव गटातून पुनम एकनाथ ठाकरे परिवर्धा हायस्कूल, माध्यमिक गटातून प्रथम  क्रमांक चिन्मय सोनार महावीर इंग्लिश स्कूल शहादा, द्वितीय क्रमांक पृथ्वीराज पवार वसंतराव नाईक शहादा, तृतीय क्रमांक नेहा रवींद्र पाटील वल्लभ विद्यामंदिर पाडळदा, उच्च माध्यमिक गट प्रथम क्रमांक ममता पटलारे सती गोदावरी विद्यालय म्हसावद, शैक्षणिक अध्यापन साहित्य निर्मिती शिक्षक गटातून प्रथम क्रमांक गोपाळ गावित जि. प. शाळा वैजाली, रंजना किरण पटेल माध्यमिक विद्यालय धामळदा, कैलास भगवान नांद्रे आश्रम शाळा कोचरा, चेतन मधुकर शिंदे जि.प. शाळा कलमाडी, गणेश नरोत्तम पाटील वल्लभ विद्यामंदिर पाडळदा यांना विविध गटातून प्रथम पारितोषिक देण्यात आले.
कार्यक्रमाला शहादा तालुक्यातून विविध शाळांचे मुख्याध्यापक तसेच शाळेचे सचिव डॉ. विलास पटेल, संचालक अशोक पाटील, यशवंत पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी ममता पटेल, शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल तावडे, माळी सर, केंद्रप्रमुख दिलीप कोंडे, शहादा तालुका मुख्याध्यापक संघटनेचे सचिव जगदीश भाई, शहादा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयदेव भाई, लक्ष्मीकांत पाटील, शरद पाटील सैंदाणे हजर होते. प्रास्ताविक शहादा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयदेव पाटील यांनी केले सूत्रसंचालन चतुर पाटील यांनी केले. उपस्थितांचे आभार शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तावडे यांनी मानले.कार्यक्रमाला वल्लभ विद्यामंदिर पाडळदे शाळेचे मुख्याध्यापक विजय पाटील पर्यवेक्षक अंबालाल चौधरी तसेच ज्येष्ठ शिक्षक विश्राम पाटील, महेंद्र पाटील, चतुर पाटील, गोपाल विसावे, दिव्या पाटील, भरत पाटील, भुपेंद्र पाकळे, गणेश पाटील, तुषार पाटील, अमृत चौधरी, धर्मेंद्र कुमार, अरविंद पटेल, राजू वसावे, मनीषा दाभाडे, मल्हारराव ठाकरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी छगन पवार, वैभव पाटील, जितेंद्र पाटील, योगेश पाडवी व शाळेतील विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम करून कार्यक्रमाला सहकार्य केले.
बातमी शेअर करा
Previous Post

नागरीक तुम्हाला महसुल देतात, नगरपालिकेचे सुखसोयी उपलब्ध करुन देणे आवश्यक : भाजपा तालुका अध्यक्ष भरत गावीत 

Next Post

पतंगोत्सवात नायलॉन मांजाचा वापराल तर होणार कडक कारवाई,जिल्ह्यात पोलीस दलाने स्थापन केले १३ पथके

Next Post
पतंगोत्सवात नायलॉन मांजाचा वापराल तर होणार कडक कारवाई,जिल्ह्यात पोलीस दलाने स्थापन केले १३ पथके

पतंगोत्सवात नायलॉन मांजाचा वापराल तर होणार कडक कारवाई,जिल्ह्यात पोलीस दलाने स्थापन केले १३ पथके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add