Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिरीष कुमार मंडळातर्फे वृक्ष पूजनसह भारत माता पूजन

team by team
March 19, 2022
in सामाजिक
0
शिरीष कुमार मंडळातर्फे वृक्ष पूजनसह भारत माता पूजन

नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील बालवीर चौकात शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे होलिकोत्सव निमित्त होळी प्रज्वलित होण्यापूर्वी वृक्ष पूजन करण्यात आले. तसेच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारत माता पूजन देखील करण्यात आले.
सन 1990 पासून शहीद शिरिषकुमार मित्रमंडळातर्फे पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या इको फ्रेंडली होळी ची परंपरा यंदाही कायम आहे.
गुरुवारी सायंकाळी बालवीर चौकात शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या हस्ते सर्वप्रथम भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर बालवीर चौक, भोईवाडा परिसरातील महिला सुवासिनी आणि बेटी बचाव अंतर्गत महाविद्यालयीन युवतींचा हस्ते तुळशी, कडूलिंब, आंबा, पेरू यासारख्या वृक्षांचे पूजन करण्यात आले. यावेळी महिलांतर्फे हळदीकुंकू उपक्रम घेण्यात आला. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी मंडळाच्या उपक्रमाची माहिती दिली. मंडळाच्या सामाजिक व राष्ट्रीय उपक्रमाबाबत पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी कौतुक केले. याप्रसंगी एपीआय वाघ, शैलेंद्र माळी, श्रीकांत पाटील,युवराज राठोड उपस्थित होते. सायंकाळी सूर्यास्तानंतर बालाजी वाड्यातील ऐतिहासिक मानाच्या होळीतून गोपाल हिरणवाळे यांनी मशाल प्रज्वलित करून आणली. त्यानंतर बालवीर चौकातील पर्यावरणपूरक होळी प्रज्वलित झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे, कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे, प्रफुल्ल राजपूत, आकाश गवळी, प्रा. एकनाथ हिरणवाळे, सिद्धेश नागापुरे, विशाल हिरणवाळे, आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

सारंगखेडा येथील अशोक पाटील यांचा महानुभव रत्न पुरस्काराने सन्मान

Next Post

जिल्ह्यात हातभट्टीची दारु निर्मित करणारे व देशी विदेशी दारुची वाहतूक करणाऱ्या 47 गुन्हे दाखल, 18 लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add