नंदुरबार l प्रतिनिधी-
कोपर्ली तालुका नंदुरबार येथेएस. आर. सी. इंदानी हायस्कूल, कोपर्ली येथे भारतरत्न, महामहीम डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.पटेल होते.
मुख्याध्यापक व्ही. के. पाटील यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी वाचनाच्या महत्त्वावर भाषणे केली. या विद्यार्थी भाषणांचे परीक्षण पी. ए पाटील यांनी केले. अनिता चौधरी यांनी प्रेरणादायी गीत सादर केले.
शेवटी अनिता चौधरी यांनी वाचन प्रतिज्ञा दिली व आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमास शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. वाचनाची आवड निर्माण करण्याचा आणि महामहीम डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांप्रमाणे ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करण्याचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता







