Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर

team by team
October 31, 2026
in राज्य
0
दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर

नंदुरबार l प्रतिनिधी-

धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील नागरिकांनी परदेशातील आपल्या प्रियजनांना दिवाळी फराळ पाठविण्यासाठी भारतीय डाक विभागाच्या सुरक्षित, किफायतशीर व विश्वासार्ह सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवर डाक अधीक्षक, धुळे विभाग, संजय ताठे यांनी केले आहे.

दीपावलीच्या पावन पर्वानिमित्त परदेशात वास्तव्यास असलेल्या कुटुंबीय, नातेवाईक व आप्तेष्टांना दिवाळी फराळ तसेच इतर अनुज्ञेय वस्तू पाठविण्यासाठी डाक विभागाची आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा धुळे विभागातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

धुळे व नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश असलेल्या धुळे विभागात 56 डाक कार्यालये व 453 शाखा डाक कार्यालये, असे विस्तृत जाळे कार्यरत आहे. या व्यापक डाक जाळ्याच्या माध्यमातून नागरिकांना विविध डाक सेवा त्यांच्या नजीकच्या डाक कार्यालयातून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मागील वर्षीही धुळे विभागातील डाक कार्यालयांमार्फत आंतरराष्ट्रीय पार्सल पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. अनेक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन परदेशातील आपल्या प्रियजनांना दिवाळी फराळ पाठविला आणि भारतीय सणांची परंपरा व आपुलकीची भावना सातासमुद्रापार पोहोचविली.

*किफायतशीर व विश्वासार्ह आंतरराष्ट्रीय सेवा*

पोस्टाची आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा ही सुरक्षित, विश्वासार्ह व किफायतशीर आहे. खासगी कुरिअर सेवांच्या तुलनेत माफक दरात पार्सल परदेशात पाठविण्याची सुविधा भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून पोस्टाद्वारे नागरिकांना उपलब्ध आहे. दिवाळीच्या कालावधीत आपल्या प्रियजनांपासून दूर असलेल्या नागरिकांसाठी ही सेवा “घरच्या दिवाळीचा फराळ परदेशातील आपल्या प्रियजनांपर्यंत” पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम ठरेल.

*बुकिंगसंबंधी महत्त्वाची माहिती*

आंतरराष्ट्रीय पार्सल बुक करण्यासाठी नागरिकांनी आपल्या नजीकच्या डाक कार्यालयास भेट द्यावी. बुकिंगसाठी प्रेषक व प्राप्तकर्त्याचा संपूर्ण पत्ता, पिन/पोस्टल कोड व मोबाईल क्रमांक उपलब्ध करून द्यावा. पार्सलमध्ये केवळ परदेशात पाठविण्यास अनुज्ञेय असलेल्या वस्तूंचाच समावेश करावा. CN 22 घोषणापत्र (Customs Declaration) अचूक व परिपूर्ण भरावे. त्यामध्ये पार्सलमधील वस्तूंचे वर्णन, संख्या, वजन व मूल्य स्पष्टपणे नमूद करावे.वस्तूंचा HSN कोड (Harmonised System Nomenclature) योग्यरीत्या नमूद करावा गंतव्य देशाच्या नियमांनुसार काही वस्तूंवर निर्बंध किंवा विशेष अटी लागू असू शकतात.

*पार्सल सेवेतील अतिरिक्त सुविधा*

*विमा सुविधा :* आंतरराष्ट्रीय पार्सलसाठी विमा सुविधा उपलब्ध आहे.

पॅकेजिंग सुविधा: पार्सल सुरक्षितरीत्या पाठविण्यासाठी डाक कार्यालयात पॅकेजिंग सुविधा उपलब्ध आहे. ट्रॅक अँड ट्रेस सुविधा पाठविलेल्या पार्सलची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी ट्रॅक अँड ट्रेस सुविधा उपलब्ध आहे. बुकिंगपूर्वी संबंधित डाक कार्यालयाकडून अनुज्ञेय वस्तू, आवश्यक कागदपत्रे, वजन, शुल्क व इतर नियमांबाबत माहिती घ्यावी. दिवाळीच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय पार्सलची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने पार्सल शक्यतो आगाऊ बुक करावे. लागू शुल्क हे गंतव्य देश, बजन व पार्सलच्या प्रकारानुसार निश्चित करण्यात येईल.

धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील सर्व नागरिकांनी परदेशातील आपले कुटुंबीय, नातेवाईक व प्रियजनांना दिवाळी फराळ पाठविण्यासाठी पोस्टाच्या आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्रवर डाक अधीक्षक धुळे विभाग धुळे संजय ताठे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

Next Post

गोदातीरावर सिंहस्थाचा शंखनाद; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

Next Post
गोदातीरावर सिंहस्थाचा शंखनाद; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

गोदातीरावर सिंहस्थाचा शंखनाद; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

November 17, 2026
विशेष शिबिरांतर्गत आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ग्रामस्थांना विविध दाखले वितरित

विशेष शिबिरांतर्गत आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ग्रामस्थांना विविध दाखले वितरित

November 17, 2026
अनेक वर्ष सत्तेत असूनही काँग्रेसनेच आदिवासींचा गौरवशाली इतिहास दाबला; डॉ. हिना गावित

अनेक वर्ष सत्तेत असूनही काँग्रेसनेच आदिवासींचा गौरवशाली इतिहास दाबला; डॉ. हिना गावित

November 17, 2026
मंत्री अशोक उईके यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांची घेतली सदिच्छा भेट

मंत्री अशोक उईके यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांची घेतली सदिच्छा भेट

November 13, 2026
आदिवासींच्या गौरवशाली संस्कृती परंपरांचा सन्मान करण्यासाठी जनजाती गौरव सेवा सप्ताह : डॉ.विजयकुमार गावित

आदिवासींच्या गौरवशाली संस्कृती परंपरांचा सन्मान करण्यासाठी जनजाती गौरव सेवा सप्ताह : डॉ.विजयकुमार गावित

November 13, 2026
आदिवासी भाषा संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासोबतच व्यसनमुक्तीसाठी एकत्रित कार्य आवश्यक:  डॉ.हिना गावित

आदिवासी भाषा संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासोबतच व्यसनमुक्तीसाठी एकत्रित कार्य आवश्यक: डॉ.हिना गावित

November 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add