Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

team by team
October 31, 2026
in राजकीय
0
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबार l प्रतिनिधी-

पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले असून त्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. दुष्काळी परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यास शासन कटिबद्ध असून, त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी नंदुरबार तालुक्यातील प्रिंप्री व नांदरखे येथील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची सद्य:स्थिती, नुकसानीची व्याप्ती आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, उपविभागीय अधिकारी बंडू कापसे, तहसीलदार संतोष ढेरे आदी उपस्थित होते.

यावेळी शेतकऱ्यांना दिलासा देताना पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने विविध निर्णय घेतले आहेत.

जिल्ह्यात कमी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी दिली. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळावी, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, शासन त्यांच्या पाठीशी असून, त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. येत्या एक-दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांची अग्रीम रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री श्री.मुश्रीफ यांनी यावेळी दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

दर्जेदार रुग्ण सेवेसाठी सर्वच शासकीय रुग्णालयातील सुविधांचा अभाव दूर करणार : डॉ. हिना गावित

Next Post

दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर

Next Post
दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर

दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर

दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर

October 31, 2026
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

October 31, 2026
दर्जेदार रुग्ण सेवेसाठी सर्वच शासकीय रुग्णालयातील सुविधांचा अभाव दूर करणार : डॉ. हिना गावित

दर्जेदार रुग्ण सेवेसाठी सर्वच शासकीय रुग्णालयातील सुविधांचा अभाव दूर करणार : डॉ. हिना गावित

October 30, 2026
ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add