Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात हातभट्टीची दारु निर्मित करणारे व देशी विदेशी दारुची वाहतूक करणाऱ्या 47 गुन्हे दाखल, 18 लाखांचा मुद्देमाल जप्त

team by team
March 19, 2022
in क्राईम
0
जिल्ह्यात हातभट्टीची दारु निर्मित करणारे व देशी विदेशी दारुची वाहतूक करणाऱ्या 47 गुन्हे  दाखल, 18 लाखांचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार l प्रतिनिधी
होळी,धुलिवंदन व आगामी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या अनुषंगाने पोलीस उप महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी संपुर्ण नाशिक परिक्षेत्रात अवैध दारू तस्करांची माहिती काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे तसेच अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते.तसच समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा व आगामी येणारे सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी खबरदारी म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यात गावठी हात भट्टीची दारु निर्मित करणारे देशी विदेशी दारुची अवैध चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरुध्द विशेष मोहिम राबवून कारवाई करण्याबाबत सुचना सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या,त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात दि.11 ते 16 मार्च 2022 दरम्यान नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे 2, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे-4 उपनगर पोलीस ठाणे- 3, नवापुर पोलीस ठाणे 6.विसरवाडी पोलीस ठाणे 5,शहादा पोलीस ठाणे- 9,धडगांव पोलीस ठाणे- 2, सारंगखेडा पोलीस ठाणे- 3,म्हसावद पोलीस ठाणे 3, अक्कलकुवा पोलीस ठाणे 5,तळोदा पोलीस ठाणे-3,मोलगी पोलीस ठाण 2 असे एकुण 47 गुन्हे हातभट्टीची दारु निर्मित करणारे व देशी विदेशी दारुची चोरटी विक्री व वाहतुक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.हातभट्टीची दारू गाळणारे व देशी विदेशी दारुची चोरटी विक्री व वाहतूक करणा-यांकडून 17 लाख 38 हजार 545 रुपये किमतीची देशी विदेशी दारु,10 लाख 60 हजार रुपये किमतीची देशी विदेशी दारू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहने तसेच लाख 96 हजार 675 रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारु व साहित्य असा एकुण 19 लाख 35 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून गुन्हेगारांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेल्या कारवाईमुळे हातभट्टीची दारु निर्मित करणारे व देशी विदेशी दारुची चोरटी विक्री व वाहतूक करणाऱ्यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालेले असून नागरीकांनी याबाबत समाधान व्यक्त करून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे कौतुक केले आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी.आर.पाटील यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक विजय पवार,उप विभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार सचिन हिरे,उप विभागीय पोलीस अधिकारी शहादा श्रीकांत घुमरे,उप विभागीय पोलीस अधिकारी अक्कलकुवा संभाजी सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व पोलीस अमंलदार,सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अमंलदार यांनी केलेली असून पुढील काळात देखील हातभट्टीची दारु निर्मित करणारे व देशी विदेशी दारुधी चारटी विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुध्द अशीच प्रभावीपणे मोहीम राबविण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शिरीष कुमार मंडळातर्फे वृक्ष पूजनसह भारत माता पूजन

Next Post

रोजंदारीचे अनुभव गुण न दिल्यामुळे नाशिक आदिवासी अप्पर आयुक्त यांच्यासह इतरांना न्यायालयाने दिली नोटीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add