Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भूजल पातळी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन : जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन

team by team
March 16, 2022
in राज्य
0
भूजल पातळी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन : जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन

नंदुरबार l प्रतिनिधी
नैसर्गिक बदलामुळे पावसाचे प्रमाण व वेळ अनिश्चित झाल्याने पाण्याचे नियोजन करणे अडचणीचे झाले आहे. अशा परिस्थितीत भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.

पंचायत समिती सभागृहात आज जलजागृती सप्ताह कार्यक्रम झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथकाचे कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर, नर्मदा विकास विभागाचे कार्यकारी अभियंता संजय खैरनार, उप कार्यकारी अभियंता मीनल वाघ, सुमास गावित, गट विकास अधिकारी महेश वळवी, उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेचे प्रा.एन.एम.भामरे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, जिल्ह्यातील सिंचन व बिगर सिंचनाचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न शासनामार्फत केले जात आहेत. मात्र, पाणी टंचाईचे प्रश्न सोडविण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग व सहकार्य मिळाल्याशिवाय पाण्याचे प्रश्न संपणार नाहीत. त्यासाठी पाण्याची उपलब्धता व पाणी वापराचे नियोजन, पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याचा गरजेपुरता वापर करणे, नैसर्गिक जलस्त्रोत, नद्या व जलाशयाचे प्रदुषण रोखणे, पाण्यासंबंधी कायदे व नियमांचे पालन करणे याबाबत समाजात जनजागृती निर्माण होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.पवार म्हणाले की, आपल्या पृथ्वीवर पिण्याचे पाणी व वापराचे पाण्याचासाठा अत्यंत कमी प्रमाणात आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. पाणी संवर्धन करताना भूगर्भामध्ये पाण्याची पातळी कशी वाढेल याची जनजागृती करण्याची काळाजी गरज आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. भूजल पातळी वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी वृक्ष लागवडीचे कामे करावीत.

श्री.चिनावलकर म्हणाले की, 16 ते 22 मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह राबविण्यात येत असून विविध विभागानी आपल्या स्तरावर गावागावात जाऊन ग्रामपंचायत,शाळा,गाव चावडी येथे जावून गावातील ग्रामस्थ, नागरिकांना सिंचन प्रकल्पाची रचना, धरण व कालव्याचे संरक्षण,कालवा फुटीच्यावेळी घ्यावयाची दक्षता, सिंचन व्यवस्थापनाच्या शिस्तीचे पालन, पाणी वापर, पाणी बचतीचे महत्व, पारंपारिक प्रवाही सिंचनामध्ये पाण्याची बचत करण्याचे उपाय, सुक्ष्म सिंचन पध्दतीचे फायदे, उपलब्ध पाण्यामध्ये घ्यावयाची विविध पिके या विषयी मार्गदर्शन करुन जनजागृती करावी.

श्री. खैरनार म्हणाले की, दरवर्षी 22 मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने 16 ते 22 मार्च दरम्यान जल जागृती सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे. हा सप्ताह साजरा करण्याचा उद्देश हा की, नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने वापर करावा, सिंचनासाठी पाणी वापरासंबंधित कायदे व नियमाबाबत लाभधारकामध्ये माहिती व्हावी, सिंचनाचे क्षेत्र वाढावे यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी यासप्ताहाचे आयोजन करण्यात असल्याचे त्यानी यावेळी सांगितले. यावेळी उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेचे श्री.भामरे यांनी पाणी बचत बाबत महत्व विषद केले.

प्रारंभी जलसप्ताहाच्या निमित्ताने जलदिडींत जिल्ह्यातून वाहणाऱ्या नर्मदा,तापी,शिवण,उदई, नागण,नेसू,रंगावली,देहली,गोमाई यानद्याचे पाणी जलकलशात घेवून जलदिडींत पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा, जीवन वाचवा, जल हे तो कल है, जल संरक्षण, धरती का रक्षण, पाऊस आला मोठा, पाण्याचा केला साठा हे घोषवाक्य सादर करीत जलदिंडीचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरापासून सुरु करण्यात येवून पंचायत समिती येथे समारोप करण्यात आला.

यावेळी जिल्ह्यातून वाहणाऱ्या विविध नद्यातील पाण्याचे पाणी जलकलशात टाकून जलकलशाचे पुजन तसेच जल प्रतिज्ञाचे सामूहिक वाचन श्रीमती खत्री यांनी केले. उप कार्यकारी अभियंता श्रीमती वाघ यांनी आभार प्रदर्शन तर सूत्रसंचलन शाखा अभियंता विजय जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नर्मदा विकास विभाग तसेच नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक,नंदुरबार येथील उपअभियंता,कनिष्ठ अभियंता,सहायक अभियंता तसेच कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

भूमिहिन आदिवासी बांधवांनी सबळीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

शहादा येथे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात जणांना सात वर्षाची शिक्षा

Next Post
महिलांना लज्जा वाटेल असे कृत्य करुन विनयभंग करणार्‍या आरोपीस तळोदा न्यायालयाने ठोठावली कारावासाची शिक्षा

शहादा येथे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात जणांना सात वर्षाची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add