Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वैंदाण्यात दोन गटात तुंबळ हाणामारी,दोन जण जखमी, नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
March 14, 2022
in क्राईम
0
अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेतल्याने तलाठ्यास मारहाण, तिघांविरूध्द गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील वैंदाणे येथे शेतीच्या वहिवाटवरुन तसेच शेतातील हरभरे मेंढ्यांनी खाल्ल्याने झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. या दोन जनाना दुखापत झाल्याची घटना घडली.याप्रकरणी परस्पर फिर्यादी दाखल करण्यात आली यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील वैंदाणे येथील डिगंबर विठ्ठल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जयेश वकील यांच्या मालकीच्या मेंढ्यांनी डिगंबर पाटील यांच्या गट क्र.४६१ मधील शेतातील हरभरे खावून नुकसान केले. याबाबत डिगंबर पाटील सांगण्यासाठी गेले असता याचा राग आल्याने डिगंबर पाटील यांना जयेश वकील पाटील याने हातातील विळ्याने डोळ्याजवळ मारुन दुखापत केली. तसेच वकील विठ्ठल पाटील, नाना विठ्ठल पाटील व अमोल नाना पाटील यांनी शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत डिगंबर पाटील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच दुसऱ्या घटनेत वैंदाणे येथील जयेश वकील पाटील व डिगंबर विठ्ठल पाटील यांच्या शेती वहिवाटीबाबत वाद होता. या वादातून येण्या-जाण्याचा रस्ता बंद केला या कारणावरुन जयेश पाटील यांना विराज डिगंबर पाटील याने चारा भरण्याच्या लोखंडी फावडा डोक्यावर मारुन दुखापत केली. तसेच डिगंबर विठ्ठल पाटील, दुर्गेश डिगंबर पाटील, प्रदिप मोहन पाटील व मोहन विठ्ठल पाटील यांनी दगडाने व हाताबुक्यांनी मारहाण करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत जयेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.ज्ञानेश्वर पाटील व ज्ञानेश्वर सामुद्रे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

रांझणी शेतशिवारात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू जखमी 

Next Post

खेकडा येथे चारा जाळल्याच्या संशयावरुन कुऱ्हाडीने वार,एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
बिलगाव येथे महिलेस लाकडाने डोक्यावर मारुन दुखापत, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

खेकडा येथे चारा जाळल्याच्या संशयावरुन कुऱ्हाडीने वार,एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add