Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

‘किल्ले रायगड’नंतर आता कुलाबा किल्ल्यावरही अनधिकृत मजार; सर्व गड-किल्ले इस्लामी अतिक्रमणमुक्त व्हायलाच हवेत : हिंदु जनजागृती समिती

team by team
January 13, 2022
in क्राईम
0
‘किल्ले रायगड’नंतर आता कुलाबा किल्ल्यावरही अनधिकृत मजार; सर्व गड-किल्ले इस्लामी अतिक्रमणमुक्त व्हायलाच हवेत :  हिंदु जनजागृती समिती

नंदूरबार l प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर नुकतेच काही धर्मांध मुसलमानांनी अनधिकृत प्रार्थनास्थळ निर्माण केले होते. जागृत हिंदूंनी आवाज उठवल्यानंतर ते हटवण्यात आले; मात्र अशाच प्रकारचे अनधिकृत बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे मुख्य केंद्र असलेल्या ‘कुलाबा किल्ल्या’वर देखील झाल्याचे उघड झाले आहे. या किल्ल्यावर अनधिकृत मजार उभारण्यात आली असून तिला पांढर्‍या रंग देण्यात आला आहे. अशा छोट्या अनधिकृत मजारींचे रुपांतर नंतर दर्ग्यात आणि पुढे जाऊन मशिदींमध्ये केले जाते. बेकायदेशीर बांधकामांद्वारे हे भूमी हडपण्याचे एक तंत्र असून हे बांधकाम तात्काळ हटवावे आणि संबधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘राजे प्रतिष्ठान दुर्ग संवर्धन विभाग’ यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण मुंबई विभाग, तसेच मुंबई आणि रायगड जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे. या वेळी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या साहाय्यक पुरातत्त्व शास्त्रज्ञ श्रीमती फाल्गुनी काटकर यांनी कुलाबा किल्ल्यावर आमचे अधिकारी जाऊन आले असून ते दोषींवर योग्य ती कारवाई करणार आहेत, असे आश्‍वासन दिले.
या वेळी भारतीय पुरातत्त्व विभागात समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक बळवंत पाठक, राजे प्रतिष्ठान दुर्ग संवर्धन विभागाचे मुंबई अध्यक्ष रोशन जंगम-बेलसेकर आणि राहुल आस्कट यांनी, तर मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर आणि रायगडच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे यांना समितीचे सर्वश्री सतीश सोनार, मंजुनाथ पुजारी, सौ. विशाखा आठवले, अवधूत बने, गिरीश जोशी आणि उदय तेली यांनी निवेदन दिले.
कुलाबा किल्ल्यांवरील अतिक्रमणाविषयी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी काही दिवसांपूर्वीच तक्रार दाखल केली होती. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने ज्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे हे घडले, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे; तसेच राज्यातील सर्वच किल्ल्यांच्या ठिकाणी अशी अतिक्रमणे झाली आहेत का, याचा अहवाल शासनाला सादर करून ती अतिक्रमणे तत्काळ हटवण्याची प्रक्रिया चालू करावी, अशी मागणी केली. पुरातत्व खाते आणि प्रशासन यांनी हे अतिक्रमण न हटवल्यास हिंदु जनजागृती समिती या प्रकरणी राज्यभरात तीव्र आंदोलन छेडेल, अशी चेतावणीही समितीने दिली आहे.
हिंदवी स्वराज्याचा कणा असलेले हे शेकडो गड-किल्ले राज्याचा ऐतिहासिक ठेवा आहे. असे असतांना अनेक किल्ल्यांवर धर्मांधांनी अनधिकृत बांधकामे, मजार, प्रार्थनास्थळे उभी करून किल्ल्यांचे इस्लामीकरण करण्याचा घाट घातला आहे. छत्रपती शिवरायांनी राज्यातील पाच इस्लामी पातशाह्यांना संपवले, तरी इस्लामी आक्रमणे आजही थांबलेली नाहीत. राज्यातील सर्व गडकोट इस्लामी आक्रमणमुक्त व्हायलाच हवेत, असेही हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे.

 

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील दहा नायलॉन मांजा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल,१२ हजारचा नायलॉन मांजा जप्त

Next Post

नंदूरबार जिल्ह्यात बुधवार रोजी आढळले 94 कोरोना रुग्ण, 19 जण झाले कोरोना मुक्त

Next Post
नंदूरबार जिल्हयात आज आढळले दोन कोरोना पॉझिटीव्ह

नंदूरबार जिल्ह्यात बुधवार रोजी आढळले 94 कोरोना रुग्ण, 19 जण झाले कोरोना मुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add