Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

साखर कारखान्यांनी ऊस दराबाबत आठ दिवसात फेरविचार न केल्यास जिल्ह्यात ऊस तोड बंद आंदोलन : अभिजीत पाटील यांचा ईशारा

team by team
December 29, 2021
in कृषी
0
साखर कारखान्यांनी ऊस दराबाबत आठ दिवसात फेरविचार न केल्यास जिल्ह्यात ऊस तोड बंद आंदोलन : अभिजीत पाटील यांचा ईशारा

नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील सहकारी व प्रायव्हेट साखर कारखान्यांनी मागील वर्षी ऊस दराबाबत घोषणा करूनही शेतकर्‍यांना ऊस दर कमी केला जात आहे. विविध मार्गाने साखर कारखाने रिकव्हरीबाबत वेळोवेळी सत्यता जाहीर करत नाही. त्यासोबत वाहतुकीचा खर्चही चुकीचा पध्दतीने लावून शेतकर्‍यांची लुट करत असल्याचे चित्र असून साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील ऊस दराबाबत आठ दिवसात फेरविचार करावा. अन्यथा शेतकरी संघर्ष समिती व ऊस उत्पादक शेतकरी यांच्यातर्फे जिल्ह्यात ऊसतोड बंद करण्याचा पावित्रा घेतला जाईल. असा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे अभिजीत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.


नंदुरबार येथे शेतकर्‍यांच्य ऊसाला योग्यभाव मिळावा. ऊस दराबाबत फेरविचार करण्यासह विविध मागण्यांचे निवेदन साखर आयुक्त जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना शेतकरी संघर्ष समिती व ऊस उत्पादक शेतकरी यांनी दिल्यानंतर नंदुरबार येथील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अभिजीत पाटील म्हणाले की, साखर कारखाने हे शासनाचा ऊसदर धोरणाप्रमाणे रिकव्हरीचा प्रमाणात भाव देण्यासाठी बांधिल असतात. परंतु प्रत्यक्ष एफ.आर.पी. प्रमाणे दर देत असतांना मुळ एसआरपीमधून तोडणी व वाहतुक खर्च जास्त लावून जिल्ह्यातील साखर कारखाने शेतकर्‍यांची फसवणूक करत आहे. एकीकडे उत्पादन खर्च वाढीत असतांना तरी देखील चालू हंगामात मागील वर्षापेक्षा कमी ऊस दर देवून कारखान्याकडून शेतकर्‍यांची फसगत होत आहे. नंदुरबार येथील जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत शेतकरी व कारखाना प्रतिनिधी यांच्या झालेल्या बैठकीवेळी असे कळविण्यात आले की, परिसरातील ऊसाची रिकव्हरी साधारणतः १०.४८ टक्के येत असून साधारणता २००९ प्रति त्यांच्या आसपास भाव बसतो. त्यातून वाहतुक खर्च व ऊस तोडणी खर्चपोटी होणारा खर्च हा शेतकर्‍यांकडून वसुल करण्यात येतो. असे कारखाना प्रतिनिधीकडून सांगण्यात आले. वास्तविक पाहता ऊस वाहतुक साधारण १०० कि.मी. परिसरातून होते. व त्यासाठी प्रतिटन ४४० रूपये खर्च येतो. असे कारखाना प्रतिनिधीकडून बैठकीत सांगण्यात आले. सदर खर्च हा शेतकर्‍यांकडून वसुल केला जातो. मुळात या कारखान्यांना पुरवठा होणारा ९० टक्के ऊस हा २५ ते ३० कि.मी.च्या कार्यक्षेत्रातील आहे. परंतु प्रत्यक्ष वाहतुक खर्च हा सरासरी १०० कि.मी.चे पॅरामीटर लावून वाढीव अंतर दाखवून जास्तीचा खर्च हा शेतकर्‍यांकडून दिशाभुल करून वसुल केला जात आहे. तसेच ऊस तोडीचा खर्च प्रतिटन साधारण ३४० शेतकर्‍यांकडून वसुल करून प्रत्यक्षात मात्र २०० पेक्षाही कमी दर ऊसतोड कामगारांना देण्यात येतो. संबंधित साखर कारखाने रिकव्हरी दर्शवित आहे. ते जाणीव पुर्वक कमी दाखवतात. सदर रिकव्हरीचाबाबतीत पारदर्शकता आणण्यासाठी शासकीय प्रतिनिधी व शेतकर्‍यांच्या प्रतिनिधींना सोबत घेवून एक समिती स्थापन करावी. त्यामध्यामातून रिकव्हरीबाबत सत्यता जाहीर करावी. असे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. पुढील श्री.पाटील म्हणाले की, ऊसतोड व वाहतुकीचा वाहतुक खर्चाचा बोजा शेतकर्‍यांवर न टाकता. सदर खर्चात कपात करावी व शेतकर्‍यांना चालू हंगामातील कमीत कमी २७०० प्रती टन ऊसाला भाव मिळावा. रिकव्हरीबाबत पारदर्शकता आणण्यासाठी शासन प्रतिनिधी, कारखाना प्रतितिनींची समिती स्थापन करावी व त्यामधून रिकव्हरीबाबत वेळोवेळी सत्यता जाहीर करावी. या विविध मागण्यांसाठी साखर आयुक्त यांच्यासह जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक विविध पक्षांच्या जिल्हाध्यक्ष यांच्यासह साखर कारखान्यांना निवेदन देण्यात आले आहे.
सदरव्या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी. आठ दिवसाचा आत शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य झाल्यास जिल्ह्यात शेतकरी संघर्ष समिती व ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावतीने ऊसतोड बंद करण्याचे आंदोलन करण्यात येईल. या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित कारखानदारांची राहील. असे यावेळी अभिजीत पाटील यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेला अभिजीत पाटील, हरी दत्तु पाटील, बुध्दर गोपाल पाटील, निरज सुरेश पाटील, अनिल गोपाल, पाटील, सतिष विलास पाटील, धमरदास मोहन पाटील, कपिल सुभाष पाटील, तुषार गोसावी, अमोल पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

तिशी येथील गोकुळ पाटील यांना खान्देश भुषण पुरस्काराने सन्मानित

Next Post

२६ व २७ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकी स्पर्धा

Next Post
२६ व २७ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकी स्पर्धा

२६ व २७ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकी स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add