नंदुरबार l प्रतिनिधी-
भाग्यचैतन्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित भारत सरकार मान्यता प्राप्त व राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त आनंदवन व्यसनमुक्ती उपचार आणि पुनर्वसन केंद्र नंदुरबाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन माजी खासदार डॉ हिना गावित यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्याय विभाग माजी उपायुक्त मोहन शेळके,माजी सिविल सर्जन डॉ कांताराव सातपुते, नगरसेवक कैलास पाटील, मोहित राजपूत, चारुदत्त कळवणकर डॉ ईश्वर धामणे श्री विष्णू पाटील महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील कुवर, प्राचार्य विश्वासराव देसले, बारकू पाटील आदी होते तर अध्यक्षस्थानी नवजीवन विकास मंडळ धुळे अध्यक्ष शशिकांत भदाणे होते.
इमारतीचे उद्घाटन याहा मोगी माता व समाज सुधारक यांच्या प्रतिमा पूजन,दीप प्रज्वलन व फीत कापून करण्यात आले.
उद्घाटन पर मनोगतात डॉ. हिना गावित यांनी आजची युवा पिढी मित्रमंडळी च्या दबावाखाली, उत्सुकते पोटी,बेरोजगारी, ताण तणाव जीवन जगत आहे म्हणून क्षणभर का होईना या तणावातून बाहेर पडण्यासाठी व्यसनाचा आधार घेत आहे, अशी व्यसनग्रस्त व्यक्ती कुटुंबाची जबाबदारी पार पाडू शकत नाही. अति प्रमाणात व्यसन केल्यामुळे त्यांचे शारीरिक मानसिक कौटुंबिक आरोग्य धोक्यात येते व अशा व्यक्तींचे आयुष्यमान कमी होते अशा लोकांसाठी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र उत्तम कार्य करत आहे त्यासाठी या केंद्राने अद्यावत सोयी सुविधा युक्त सुंदर इमारत उभी केली त्या बद्दल अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या व सहकार्य करण्याची आश्वासन दिले.
डॉ सातपुते व प्राचार्य डॉ सुनील कुवर यांनी आपल्या मनोगतात एक व्यक्ती जरी व्यसन करीत असला तरी त्याचा त्रास व परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतो त्यामुळे परित्याग व घटस्फोट यांची संख्या देखील वाढत आहे म्हणून अशा व्यक्तींसाठी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र हे संजीवनी आहे म्हणून आयुष्य संपवण्यापेक्षा व्यसन संपवा असा संदेशही त्यांनी दिला. अध्यक्षीय समारोपात श्री शशिकांत भदाणे यांनी व्यसन हा शरीराचा आजार नसून मनाचा आजार आहे व तो उपचाराने बरा होतो म्हणून व्यसनग्रस्त व्यक्तींनी फक्त कुटुंबाने बरं न करता त्यांना बरं करणे ही सर्व समाजाची जबाबदारीआहे त्यासाठी समाजाने अशा केंद्राच्या मार्फत प्रयत्न करावे असे आग्रही प्रतिपादन केले तसेच हे या केंद्रात तज्ञ डॉक्टर, समुपदेशक,परिचारक प्रशिक्षक,योगशिक्षक,गट साधन समन्वयक, सामाजिक कार्यकर्ते इत्यादींच्या मदतीने व मार्गदर्शनाने संस्था उत्तम कार्य करीत आहे म्हणूनच संस्थेला महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा हा राज्यस्तरीय पुरस्कार सामाजिक न्यायमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजस देसले यांनी केले तर पाहुण्यांचे परिचय व स्वागत सुभाष कोकणी यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्य चैतन्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा डॉ मधुकर देसले यांनी केले तर नितीन सनेर यांच्या ऋण निर्देशाने कार्यक्रमांची सांगता झाली. या प्रसंगी शहरातील समाजातील राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थित मोठ्या संख्येने होती.








