नंदुरबार l प्रतिनिधी-
भाजपा सदस्यता अभियान राबविण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त मतदारांनी भारतीय जनता पक्षाचा सदस्य व्हावं यासाठी 17 जानेवारी 2025 रोजी दुपारी साडेतीन वाजता मा. आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित भाजपा जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पाटील भाजपा तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ सदस्य भास्कर पाटील, माजी तालुकाध्यक्ष दीपक पाटील, मुन्ना पाटील, प्रफुल्ल पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाचे सदस्यता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून डॉक्टर विजयकुमार गावित यांनी या अभियानाला दिलेली गती पाहायला मिळत आहे.