नंदुरबार l प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकास कामांचे आज भूमिपूजन व नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आज शनिवार, दि.18 जानेवारी रोजी नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या म.ज्योतिबा फुले भाजीपाला मार्केट यार्डातील लिलाव शेडचे भूमिपूजन आ. राजेश पाडवी, मुख्य बाजार आवारात डांबरीकरण व ओटे बांधकामाचे भूमिपूजन आ. शिरीषकुमार नाईक, कल्याणी पेट्रोल पंप जवळील शॉपिंग सेंटरसह गोडाऊनचे भूमिपूजन आ. आमश्या पाडवी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील,जि.प माजी अध्यक्ष वकील पाटील, जि.प माजी अध्यक्ष भरत गावित,जि.प माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल,जि.प माजी सदस्य विजयसिंह पराडके, पं.स माजी सभापती अंजना वसावे, सामाजिक कार्यकर्ते इंजि.किरण तडवी, माजी सभापती विक्रमसिंह वळवी, शेतकी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील,,जि.प माजी सदस्य देवमन पवार, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. सयाजीराव मोरे,पं.स माजी उपसभापती छाया पवार, भाजीपाला असोसिएशनचे अध्यक्ष विजय माळी उपस्थित राहणार आहेत.
नवनिर्वाचित आ. राजेश पाडवी, आ.आमश्या पाडवीआ.शिरीषकुमार नाईक यांच्या सत्कार संजय टाऊन हॉल येथे करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन बाजार समिती सभापती संध्या पाटील, उपसभापती गोपीचंद पवार यांच्यासह सर्व संचालक मंडळाने केले आहे.