म्हसावद। प्रतिनिधी
म्हसावद,ता.शहादा येथे शुक्रवारी रात्रीतून घरफोडी झाली असून रोख रक्कमेसह तीन लाख सात हजार रूपयाची चोरी झाली आहे.याबाबत म्हसावद पोलीसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रानुसार माहीती अशी की, म्हसावद येथील अनिल तुकाराम पाटील(चिखली कानडीकर) हे गोगापुर,ता.शहादा येथे नातेवाईकांत निधन झाल्याने तीन चार दिवसापासून गेले होते. दरम्यान ते शनिवारी संध्याकाळी सात वाजता घरी परत आल्यावर दाराचा कडी कोयंडा तोडून चोरी झाल्याचे लक्षात आले. घरातील सामान अस्ताव्यस्त स्थितीत होता.तीनही कपाटे उघडीच होती.यातून रोख रक्कम एक लाख पाच हजार,साठ हजार रूपये किमतीची सोन्याची चैन दोन तोळे,चोवीस हजार रूपयाची एक सोन्याची अंगठी ८ ग्रॅम, पंच्च्याहत्तर हजार रूपयेचा सोन्यांचा हार
२ तोळे ५ ग्रॅम,अठरा हजार रूपयेचा तीन लहान सोन्याच्या आंगठ्या प्रत्येकी २ ग्रॅम वजनाच्या एकुण ६ ग्रॅम,बारा हजार रूपये किमतीचा दोन कानातील सोन्याचे झुमके ४ ग्रॅम,एक हजार दोनशे ऐशी रूपयेचा चार लहान चांदीचे कडे प्रत्येकी १ भार (१० ग्रॅम) दोन हजार पाचशे साठ रूपये किमतीचे चार जोड चांदीचे चाळ ८० ग्रॅम वजन,तीन हजार आठशे चाळीस रूपये किमतीचे चार जोड चांदीचे लहान चाळ १२० ग्रॅम वजन,दोन हजार रुपये किमतीची एक टायटन कंपनीची घड्याळ, एक हजार रुपये किमतीची एक टायटन कंपनीची घडयाळ असा रोख रक्कमेसह तीन लाख सात हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरीस गेला आहे.
पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार,पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी घटनास्थळी भेट देवून कर्मचारी वर्गास सूचना केल्या. नंदुरबार येथून ठसे तज्ञ पथकातील
एपीआय एस.एस.वाडके, पो.नाईक संजय रामोळे,
श्वान पथकातील पो.ह.दिलीप गावीत, पो.ह.सुकलाल गावीत श्वान..एन्जल,पुरूषोत्तम साठे यांनी कार्यवाही केली.अनिल पाटील यांच्या फिर्यादीवरून म्हसावद पोलीसात भादवि कलम ३८०,४५४, ४५७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील पुढील तपास करीत आहे.