नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील शनिमांडळ येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा चेअरमनपदी नामदेव परशराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांच्या आमदार कार्यालयात सत्कार केला.
नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदासाठी नुकतीच विशेष सभा घेण्यात आली होती. विहित मुदतीत चेअरमनपदासाठी नामदेव पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ऍड.राम रघुवंशी तर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन विक्रमसिंह वळवी, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील,शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ.सयाजीराव मोरे,संतोष पाटील, मधुकर पाटील,संतोष खंडू पाटील,ठाणसिंग राजपूत,जगन पाटील,हिम्मत पाटील, संतोष धनगर,हिरामण माळी,ठाणसिंग राजपूत,चतुर गिरासे,भास्कर पाटील,जितेंद्र पवार,कृष्णा राजपूत, शिवाजी पाटील,दिलीप घुगे,सरदारसिंग राजपूत, गोविंदा माळी,किरण घुगे,सुनिल गिरासे,पिंटू न्हानबो आदी उपस्थित होते.