Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर झाल्याने यंदाही गणपती कारखान्यांमध्ये हजारो मोठ्या मुर्त्या पडुन

team by team
June 30, 2021
in सामाजिक
0
यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर झाल्याने यंदाही गणपती कारखान्यांमध्ये हजारो मोठ्या मुर्त्या पडुन
नंदुरबार| प्रतिनिधी
राज्य शासनाने यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे गणेशमुर्तीसाठी चार फुटांची तर घरगुती गणेशमुर्ती दोन फुटांची असावी अशी मर्यादा घालून दिली आहे. मागील वर्षीही अशीच नियमावली असल्याने नंदुरबार शहरातील कारखान्यामध्ये ५ ते २० फुट उंचीचा पाच हजारापेक्षा जास्त अधिक मुर्त्या तशाच पडून आहे.त्यामुळे कारागीरांना मोठ्या प्रमाणावर आर्थीक  संकटांशी सामना करावा लागत आहे. गणेशोत्सवाला अवघे सव्वादोन महिने बाकी असतांनाही अद्यापही शांतताच आहे.
नंदुरबारचा गणेशोत्सव व येथील गणेशमुर्त्या राज्यात प्रसिध्द आहे. दरवर्षी राज्यासह गुजरात व मध्यप्रदेशातील गणेश मंडळ मोठया संख्येने नंदुरबार येथून गणपतीच्या मोठया मुर्त्या घेवून जात असतात. उत्सवांमधील सर्वात मोठा उत्सव असलेल्या गणेशोत्सवातील बाप्पांची मुर्ती मागील वर्षाप्रमाणेही यंदा लहान असणार आहे. राज्य शासनाने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक गणेश मंडळासाठी चार फुटांची तर घरगुती गणेशमुर्ती दोन फुटांची असावी. अशी मर्यादा घालून देण्यात आली आहे. कोरोनाची दुसरीलोट ओसरत असली तरी धोका ओळखून राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली निर्धारीत केली आहे. यामध्ये विविध नियमावली घालून दिल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील गणेशमुर्ती बनविणारे कारखान्यामध्ये उत्सवाच्या सहा महिन्या अगोदर लगबग सुरू असते यंदा अवघ्या सव्वा दोन महिन्यावर गणेशउत्सव आला तरीही कारखान्यांमध्ये शांतता दिसून येत आहे. मागील वर्षीही शासनाने याच प्रमाणे नियमावली जाहीर केली होती. त्यामुळे मागील वर्षी नंदुरबार शहरातील गणपती बनविणार्‍या कारखान्यांमध्ये पाच फुटापासून तर २० फुटांपर्यंत गणेशमुर्त्या बनवून ठेवल्या होत्या. मात्र शासनाने नियमावली जाहीर केल्याने त्यामुर्त्या तसेच पडून होत्या. अनेक मंडळांनी मागील वर्षी तीन महिन्याआधी मुर्ती बुकींग करून ठेवल्या होत्या. त्यांनाही पैसे परत करावे लागले होते. त्यामुळे मुर्ती कारागीरांना लाखोंचा फटका बसला होता. बँक खाजगी व्यक्ती यांच्याकडून कर्जाचा बोजा अजूनही त्यांच्यावर कायम आहे. परत यंदाही नियमावली जाहीर केल्याने मागील वर्षाच्या मुर्ती तसेच पडून राहणार आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

१०० टक्के लसीकरण करणारी खेतिया नगरपरिषद मध्यप्रदेशात प्रथम

Next Post

कुकलट येथे श्रमदानासाठी विविध संघटना सरसावल्या

Next Post
कुकलट येथे श्रमदानासाठी विविध संघटना सरसावल्या

कुकलट येथे श्रमदानासाठी विविध संघटना सरसावल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add