Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

team by team
November 4, 2026
in राजकीय
0
डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

नंदुरबार l प्रतिनिधी-

माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील यांनी नाशिंदा येथील पावबा ऋषी यांच्याकडे नवस केला होता. डॉ. गावित यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर या नवसपूर्तीसाठी बुधवारी (४ नोव्हेंबर) नंदुरबार ते नाशिंदा अशी सुमारे २२ किलोमीटरची पदयात्रा काढण्यात आली.

नंदुरबार येथून सुरू झालेली ही पदयात्रा उमर्दे खुर्द, वडवद, भालेर आणि काकरदे मार्गे नाशिंदा येथे पोहोचणार आहे. तेथे पावबा ऋषीच्या मंदिरात धार्मिक विधी करून नवसपूर्ती केली जाणार आहे.
या पदयात्रेचे स्वागत भालेर येथे काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्कर पाटील यांनी केले.

 

 

या पदयात्रेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, मा.जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, भाजपचे नंदुरबार तालुकाध्यक्ष दीपक पाटील, नंदुरबार पालिकेचे विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य शोभा पाटील, होळ तर्फे रनाळेचे सरपंच व्यंकटेश पाटील, बलवंडचे सरपंच संजय पाटील, भालेरचे चंद्रशेखर पाटील, भिका पाटील, रमेश पाटील, वैदाणेचे माजी सरपंच डॉ. मनोज पाटील, कंढरे येथील लोटन पाटील, सुपडू पाटील, मुन्ना पाटील, प्रकाश भोई यांच्यासह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते.

 

 

पदयात्रेतील सहभागी भाविकांसाठी भालेर येथील राम मंदिर परिसरात नाश्त्याचे आयोजन करण्यात आले होते. नाश्ता आटोपल्यानंतर पदयात्रा पुढील प्रवासासाठी नाशिंदा
कडे रवाना झाली. डॉ. गावित यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि केलेला नवस पूर्ण करण्यासाठी ही दिंडी काढण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add