खेतिया ! प्रतिनिधी
बडवानी जिल्ह्यातील खेतिया नगरपरिषदेने कोरोना विषाणू सारख्या सुरू असलेल्या संघर्षात मशाल आणली. जिल्हा व राज्यात १०. टकके लसीकरण करणारी पहिली नगर परिषद असल्याचा मान मिळाला आहे. खेतिया शहराची कामगिरी आणखी महत्त्वाची ठरली आहे.कारण कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या दरम्यान हा भाग महाराष्ट्राशी जवळीक असल्यामुळे जास्त प्रभावित झाला होता. कारण इथला व्यवसाय, एका राज्यातून दुसर्या राज्यात जाणार्या लोकांची प्रक्रिया सुरूच होती. कोरोना विषाणूंपासून या भागातील रहिवाशांना वाचविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे शक्य तितक्या लवकर १०० टक्के पात्र रहिवाशांना लसीकरण करणे आणि हे काम येथील नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी – कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांनी केले आहे. खेतिया येथील नागरिकांना हे समजले की खेतिया शहर हे कोरोना लसीकरण मोहिमेत प्रथम स्थानावर आहे, तात्काळ लोकांनी फटाके फोडून व एकमेकांना मिठाई खाऊ घालून आनंद व्यक्त केला.
बडवानी जिल्हयाचे कोरोना प्रभारी मंत्री प्रेमसिंह पटेल, राज्यसभेचे खा.डॉ. सुमेरसिंग सोलंकी, लोकसभेचे खासदार गजेंद्रसिंग पटेल, जिल्हाधिकारी शिवराजसिंह वर्मा यांनी आनंद व्यक्त करताना खेतिया नगरमधील रहिवासी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्ष, पत्रकार, आरोग्य विभाग, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना श्रेय दिले आहे. ज्यांनी सामूहिक प्रयत्नातून हे यश संपादन केले आणि जिल्ह्याचा मान वाढविला. उपलब्ध आकडेवारीनुसार खेतिया नगरपरिषदेची एकूण लोकसंख्या १४०९५ आहे. यापैकी ४०८६ हे १८ वर्षाखालील रहिवासी आहेत. अशा प्रकारे येथे १०हजार ९ लोकांना लसी देण्यात येणार होती. बुधवार २३ जूनपर्यंत येथे १०१३६ लोकांना लस देण्यात आली होती. सर्वेक्षण करताना असे दिसून आले की, खेतिया नगरात १८ वर्षाच्या ९५३२ लोकांना लसीकरण झाले आहे. उर्वरित ४७७ लोक अशी आहेत की ज्यांना कोरोनामुळे प्रभावित झाल्यामुळे किंवा गर्भवती, दाई किंवा पलायन करून गेल्यामुळे लसीकरण करता आले नाही. या सर्वेक्षणात असेही समजले की, १२७ नागरिकांनी महाराष्ट्रातून किंवा जिल्ह्यातील इतर भागातील रहिवासी होते आणि त्यांनी खेतिया येथे लसी घेतल्या आहेत. खेतिया शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याने प्रशासनाच्यावतीने समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
फोटो – खेतिया शहरात १०० % लसीकरण पूर्ण करून जिल्ह्यातील व मध्यप्रदेशातील पहिले शहर ठरल्याने फटाके फोडून व मिठाई खाऊ घालून आनंद व्यक्त करतांना प्रशासकीय अधिकारी – कर्मचारी, नगरपरिषद खेतियाच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष, नगरसेवक, परिषदेचे अधिकारी – कर्मचारी, खेतिया शहरातील रहिवासी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्ष, पत्रकार, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.