Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासींच्या गौरवशाली संस्कृती परंपरांचा सन्मान करण्यासाठी जनजाती गौरव सेवा सप्ताह : डॉ.विजयकुमार गावित

team by team
November 13, 2026
in राजकीय
0
आदिवासींच्या गौरवशाली संस्कृती परंपरांचा सन्मान करण्यासाठी जनजाती गौरव सेवा सप्ताह : डॉ.विजयकुमार गावित

आदिवासींच्या गौरवशाली संस्कृती परंपरांचा सन्मान करण्यासाठी जनजाती गौरव सेवा सप्ताह : डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी-

जनजातीय गौरव सेवा सप्ताह हा आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक योगदानाचा सन्मान करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. तरी जिल्ह्यातील नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, युवक मंडळे, महिला बचत गट, विद्यार्थी, शिक्षक तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या सप्ताहात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह-२०२६’ यशस्वी करावा, असे आवाहन महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, भाजपा जनजातीय गौरव महोत्सवाच्या प्रदेश सहसंयोजक तथा संसद रत्न माजी खासदार डॉ. हिना गावित आणि भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित यांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त विविध लोककल्याणकारी उपक्रम राबविणार असून नंदुरबार जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि विविध प्रशासकीय विभाग यांच्या माध्यमातून 11 ते 18 नोव्हेंबर दरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह-2026’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. त्याची सविस्तर माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. नंदुरबार येथील तहसीलदार संतोष डेरे, एकात्मिक आदिवासी प्रकल्प नंदुरबार येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी किरण मोरे हे देखील या प्रसंगी उपस्थित होते.

नंदुरबार तहसील कार्यालयात संपन्न झालेल्या या पत्रकार परिषदेत बोलताना माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की, भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, जल, जंगल आणि जमिनीच्या संरक्षणासाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर रोजी ‘जनजातीय गौरव दिन’ जिल्हाभरात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी बांधवांच्या आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी विविध विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये सिकलसेल रुग्णांना उपचार व शासकीय लाभ मिळवून देणे, दुर्गम भागातील नागरिकांचे आधार कार्ड अद्ययावतीकरण करणे तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांचा गौरव करण्यावर भर देण्यात येणार आहे.

डॉ. हिना गावित यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, जनजातीय गौरव सेवा सप्ताह हा आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक योगदानाचा सन्मान करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, आरोग्य व शैक्षणिक सुविधांबाबत जनजागृती करणे, महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे आणि आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हा जिल्हा प्रशासनाचा मुख्य उद्देश आहे. डॉ. सुप्रिया गावित यांनीही 15 नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांची 151 वी जयंती ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून भव्य स्वरूपात साजरी केली जाईल, अशी माहिती देत सप्ताह आयोजनाचे स्वरूप स्पष्ट केले तसेच जिल्ह्यातील नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, युवक मंडळे, महिला बचत गट, विद्यार्थी, शिक्षक तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या सप्ताहात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह-२०२६’ यशस्वी करावा, असे आवाहन केले.

*असा साजरा होईल सप्ताह*

या सप्ताहामध्ये सर्व शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून विविध सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक व कल्याणकारी उपक्रम राबविले जाणार आहेत. यात-

13/11/2026 रोजी नंदुरबार शहर व ग्रामीण भाग न्यूक्लिअस बजेट योजनांची माहिती देण्यासाठी विशेष कक्ष व योजनानिहाय अर्ज स्वीकारणे; लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन.

14/11/2026 रोजी नगरपालिका, पं. स. व ग्रामपंचायती आदिवासी स्मारके व पुतळ्यांची स्वच्छता मोहीम आणि दीपोत्सव; आदिवासी देव-देवता, पूजा पद्धती, संस्कृती व अस्मिता संवर्धन जनजागृती कार्यक्रम.

15/11/2026 रोजी नियोजन भवन, जि. का. नंदुरबार (मुख्य जिल्हास्तरीय सोहळा) – बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पांजली अर्पण करणे. – न्यूक्लिअस बजेट: नवीन आदिवासी महिला बचत गटांना प्रत्येकी 10,000 रुपये अर्थसाहाय्य व वैयक्तिक लाभ वाटप. – राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजना: एका बचत गटास 7,50,000 रुपये अर्थसाहाय्य. – वनपट्टेधारक शेतकऱ्यांना 7 (ई) व 12 (ई) चे वाटप. – आदिवासी कलाकार व वैदू यांना पारितोषिक, सन्मानपत्र वाटप; आदर्श मुख्याध्यापकांना पारितोषिक. – शबरी महामंडळ / उमेद (MSRLM) व मशरूम उत्पादकांचे विशेष प्रदर्शन व विक्री स्टॉल्स. – आरोग्य तपासणी शिबिर व तालुक्यातील सर्व आदिसेवा केंद्रांमध्ये प्रतिमा पूजन व अभिवादन.

16/11/2026 सेतू सुविधा केंद्रे, पं. स. व ग्रा. पं. विशेष एकदिवसीय शिबिर: जात, उत्पन्न, अधिवास (Caste, Income, Domicile) दाखले वाटप व आधार कार्ड दुरुस्ती; कृषी विभागामार्फत शेतकरी ऑनलाईन नोंदणी व पीकविमा प्रक्रिया.

17/11/2026 रोजी GMC नंदुरबार, रुग्णालये व अंगणवाड्या वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य विभागामार्फत रक्तदाब, मधुमेह व सिकलसेल तपासणी शिबिरे; महिला व बालविकास विभागामार्फत पोषण आहार सत्र; कवयित्री बहिणाबाई चौधरी उ.म.वि. अभ्यासन केंद्रामार्फत विशेष कार्यक्रम.

 

18/11/2026 रोजी प्रकल्प कार्यालय, नंदुरबार 12 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत सर्व यंत्रणांमार्फत आयोजित कार्यक्रमांचा एकत्रित अहवाल संकलित करून वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.
जनजातीय गौरव सेवा सप्ताहाच्या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, आरोग्य व शैक्षणिक सुविधांबाबत जनजागृती करणे, महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे आणि आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हा जिल्हा प्रशासनाचा मुख्य उद्देश आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी भाषा संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासोबतच व्यसनमुक्तीसाठी एकत्रित कार्य आवश्यक: डॉ.हिना गावित

Next Post

मंत्री अशोक उईके यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांची घेतली सदिच्छा भेट

Next Post
मंत्री अशोक उईके यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांची घेतली सदिच्छा भेट

मंत्री अशोक उईके यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांची घेतली सदिच्छा भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंत्री अशोक उईके यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांची घेतली सदिच्छा भेट

मंत्री अशोक उईके यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांची घेतली सदिच्छा भेट

November 13, 2026
आदिवासींच्या गौरवशाली संस्कृती परंपरांचा सन्मान करण्यासाठी जनजाती गौरव सेवा सप्ताह : डॉ.विजयकुमार गावित

आदिवासींच्या गौरवशाली संस्कृती परंपरांचा सन्मान करण्यासाठी जनजाती गौरव सेवा सप्ताह : डॉ.विजयकुमार गावित

November 13, 2026
आदिवासी भाषा संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासोबतच व्यसनमुक्तीसाठी एकत्रित कार्य आवश्यक:  डॉ.हिना गावित

आदिवासी भाषा संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासोबतच व्यसनमुक्तीसाठी एकत्रित कार्य आवश्यक: डॉ.हिना गावित

November 13, 2026
डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add