नवापूर | प्रतिनिधी
तालुक्यातील दुधवे येथे वनविभागाच्या गस्ती पथकाने ५० हजाराचे अवैध सागवानी लाकूड जप्त केले आहे.
सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार यांना दुधवे येथे अवैध लाकूड असल्याची माहिती मिळाली. या गुप्त बातमीवरून वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी, श्रीमती स्नेहल अवसरमल व स्टाफच्या पथकाने तालुक्यातील दुधवे येथे तपासणी केली. तेथे ठिकठिकाणी साग नग मिळून आले. या सागवानी लाकूड ०.९७१ घ.मी.असून संपुर्ण मालाची किंमत ५० हजार आहे.
सदर कार्यवाही वनसंरक्षक दि.वा.पगार, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, विभागीय वनाधिकारी संजय पाटील, सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार, वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी व श्रीमती स्नेहल अवसरमल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.