नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील युवा कवी साहित्यिक, आदिवासी एकता परिषद व विद्रोही साहित्य सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते आप संतोष पावरा यांना दिवंगत ‘व्यंकटेश आत्राम साहित्य गौरव’ हा राज्यस्तरीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘ढोल’ या कविता संग्रहाला हा पुरस्कार मिळाला आहे.
२०१७ साली प्रकाशित झालेल्या ‘ढोल’ या कविता संग्रहात १७ कविता पावरी मातृभाषेत, ३१ मराठी आणि ४ हिंदी भाषेत अशा एकूण ५२ कवितांचा समावेश आहे. या कविता संग्रहाला पुणे विद्यापीठाचे मराठी विभाप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे यांची प्रस्तावना आहे. या संग्रहातील १० आदिवासी पावरी बोलीभाषेतील कविता भारत सरकार साहित्य अकादमी दिल्लीचे, क्षेत्रीय कार्यालय मुंबई मार्फत आदिम भाषाफ पुस्तकात प्रकाशित झाल्या आहेत.
ढोल कविता संग्रहाला, पडकी फाऊंडेशनच्या वतीने २०१७ चा डॉ. गोविंद गारे आदिवासी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, आदिवासी साहित्य अकादमी महाराष्ट्र तर्फे आप. प्रतापभाऊ गायकवाड राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार तर २०२१ साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुणे येथे राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. लवकरच व्यंकटेश आत्राम राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार वर्धा येथे एका कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.