Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्रातील किमान 20 ते 22 महत्त्वाच्या गड-किल्ल्यांवर अतिक्रमणे

team by team
November 14, 2022
in राज्य
0
महाराष्ट्रातील किमान 20 ते 22 महत्त्वाच्या गड-किल्ल्यांवर अतिक्रमणे
नंदूरबार l प्रतिनिधी
प्रतापगडाच्या पायथ्याशी ‘शिवप्रतापभूमी’वरील दर्गा, मशिद यांसह निर्माण केलेली अनधिकृत बांधकामे काढून टाकण्यासाठी आम्ही ‘शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलना’ची स्थापना करुन आम्ही संघटीतपणे लढा दिला. सध्या विविध गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आंदोलने करत आहे.
 विशेषकरून विशाळगडावरील अतिक्रमणांच्या मुक्तीसाठी समिती लढा देत आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने प्रतापगडाच्या पायथ्याला असणारे अतिक्रमण हटवले, त्याप्रमाणे सरकारने महाराष्ट्रातील अन्य गड-किल्ल्यांवरील अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून त्यांना इस्लामी अतिक्रमणापासून मुक्त करावे आणि या सर्व गड-किल्ल्यांना पूर्वीचे गतवैभव प्राप्त करुन द्यावे, अशी मागणी माजी आमदार आणि ‘शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलना’चे निमंत्रक नितीन शिंदे यांनी केली.ते हिंदु जनजागृती समिती आयोजित प्रतापगडावरील अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त  अन्य किल्ल्यांवरील अनधिकृत बांधकामांचे काय ? या विषयावर आयोजित विशेष संवादात बोलत होते.
ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे म्हणाले की,अफजलखानाने अनेक मंदिराचा विध्वंस केला आणि अनेक हिंदूंना बाटवले. याच अफजलखानाच्या कबरीचे अनधिकृत बांधकाम प्रतापगडाच्या पायथ्याशी करून त्याचे उद्दात्तीकरण करण्यात आले. या गोष्टींची सर्व शिवभक्तांना चीड येत होती. उच्च न्यायालयाने त्यावेळी अनधिकृत बांधकाम काढण्याचे आदेश तत्कालीन राज्य सरकारला दिले असतांनाही त्याची अंमलबजावणी होत नव्हती. शेवटी सध्याच्या महाराष्ट्र सरकारने हे अनधिकृत बांधकाम तोडले, ही शिवभक्तांना आनंद देणारी गोष्ट आहे.
या वेळी वाई, सातारा येथील प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक श्रीमती विजयाताई भोसले म्हणाल्या की, या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व शिवभक्तांना माता भवानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद लाभले आहेत.
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक  सुनील घनवट म्हणाले की, आताच्या सरकारने प्रतापगडावरील अतिक्रमण हटवले, ही सरकारची कृती अभिनंदनीय आहे. हा तर आरंभ आहे, असे आम्ही मानतो. महाराष्ट्रातील किमान 20 ते 22 महत्त्वाच्या गड-किल्ल्यांवर अतिक्रमणे झाली असून यांविषयी वन विभाग, राज्य आणि केंद्रीय पुरातत्त्व विभाग या सर्वांना माहिती असून ते या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करत आहेत.
वन विभाग, पुरातत्त्व विभाग यांच्यासह महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील सर्व गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवावीत, अशी समस्त हिंदू संघटनांची मागणी आहे. प्रत्येक गड-किल्ल्याचे संवर्धन करून तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची स्मारके उभारली पाहिजेत, यासंदर्भात शिंदे-फडणवीस सरकारने लक्ष घालावे अशी आमची मागणी आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी विक्रीसाठी नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

कौली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गुलाबसिंग तडवी यांची निवड

Next Post
कौली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गुलाबसिंग तडवी यांची निवड

कौली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गुलाबसिंग तडवी यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add