Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

team by team
August 10, 2026
in कृषी
0
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

नंदुरबार l प्रतिनिधी-

शासकीय कृषि महाविद्यालय, नंदुरबार येथील कीटकशास्त्र विभागाच्या अनुभवाधारित प्रशिक्षण या अभ्यासक्रमांतर्गत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी वावद शिवारातील शेतकऱ्यांना भेट देऊन जैविक कीड व्यवस्थापन, जैविक कीडनाशकांचा योग्य वापर आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध जैविक उत्पादनांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसमोर सादर केले.

या शेतभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी कापूस विविध पिकांमध्ये आढळणाऱ्या प्रमुख किडी व रोगांचा प्रादुर्भाव, त्यांची लक्षणे, नुकसानीची पातळी तसेच त्यांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या (IPM) उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली.
जैविक कीडनियंत्रण प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या फुले ट्रायकोडर्मा, फुले ब्यूव्हेरिया, फुले मेटारायझियम, फुले बगीसाइड, निंबोळी अर्क आणि फुले ट्रायकोकार्ड या जैविक उत्पादनांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक यावेळी घेण्यात आले. जैविक कीडनियंत्रण तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन, मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे संरक्षण, जैवविविधतेचे जतन, कृषी उत्पादनातील रासायनिक अवशेषांचे प्रमाण कमी करणे आणि दीर्घकालीन शाश्वत शेतीला चालना देणे शक्य होते, याबाबतही विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यु. बी. होले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कृषी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घ्याव्यात, आधुनिक आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा प्रसार करावा तसेच ‘प्रयोगशाळेतून शेतापर्यंत’ कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करावे, यासाठी डॉ. होले यांनी प्रोत्साहन दिले. या उपक्रमादरम्यान मॉड्यूल प्रभारी डॉ. के. व्ही. देशमुख, सहाय्यक प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते. अनुभवाधारित प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ प्रयोगशाळेतील ज्ञान न देता ते ज्ञान प्रत्यक्ष शेतावर वापरण्याची संधी मिळते, असे डॉ. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणे, त्यांच्या पिकांमधील कीड व रोगांच्या समस्या जाणून घेणे, शास्त्रशुद्ध सल्ला देणे आणि जैविक व पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रसार करणे हा या शेतभेटीचा प्रमुख उद्देश होता. या उपक्रमास शेतकरी बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रगतिशील शेतकरी नवलसिंग गिरासे, विशाल राजपूत तसेच वनविभागाच्या रेखा गिरासे, गणेश जगदेव, सुरेश पाटील, पंकज राजपूत, डॉ. पुष्यमित्र जोगदंडे यांच्यासह परिसरातील इतर शेतकरी उपस्थित होते.

 

 

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अनुभवाधारित प्रशिक्षणातील विद्यार्थी संतोष पाडवी, युवराज ठाकरे, प्रीतम देसाई, सचिन भोये, नितीन चौधरी, प्रेमराज नाईक, धनराज वसावे, रोहित कोकणी, अनिकेत वळवी, मनीष इंगळे आणि अमित भोये यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या नियोजन व समन्वयासाठी डॉ. के. व्ही. देशमुख आणि प्रसाद गांगुर्डे, कृषि सहाय्यक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

बातमी शेअर करा
Previous Post

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

Next Post

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add