Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

team by team
August 10, 2026
in शैक्षणिक
0
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नंदुरबार l प्रतिनिधी-

पथराई ता. नंदुरबार येथील के.डी. गावित सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्ध स्पर्धेत १०५ विद्यार्थ्यांचा सहभाग. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या नियंत्रणाखाली महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धा २०२६ मध्ये के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात घेण्यात आली, स्पर्धेत १०५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या कल्पकता, सर्जनशीलता व सौंदर्यदृष्टीला चालना मिळावी, तसेच रंग-रेषांच्या माध्यमातून त्यांच्या मनातील कल्पनांना मुक्त अभिव्यक्तीचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आठ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध विषयांवर कल्पक आणि आकर्षक चित्रे साकारली.
स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी रंगसंगती, रेषांकन आणि कल्पनाशक्तीचा सुरेख मिलाफ साधत आपल्या कलात्मक प्रतिभेचे दर्शन घडविले.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे विद्यालय परिसरात कलात्मक आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.
स्पर्धेचे नियोजन उमेश राजपूत यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांचे निरीक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य शरद पाटील, प्रल्हाद संदानशिव, भागुराव जाधव, विद्या पाडवी आणि सुरेश पाडवी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

Next Post

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

Next Post
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

August 10, 2026
कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

कोपर्ली येथील इंदाणी विद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सैनिकी विद्यालयात राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 10, 2026
शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

शासकीय कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जैविक कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

August 10, 2026
शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारणी जाहीर; जिल्हा प्रमुख म्हणून अमर वळवी यांची फेरनियुक्ती

August 10, 2026
आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी संस्कृतीच्या रंगांनी सजले एस. ए. मिशन विद्यालय, जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

August 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add