नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा
नंदुरबार l प्रतिनिधी-
नांदर्खे ता. जि.नंदुरबार येथील प्रगती विद्या प्रसारक संस्था संचलित वि.जा. भ.ज. प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मुख्याध्यापिका प्राप्ती पाटील व प्राथमिक मुख्याध्यापक सागर नामगे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाग्यश्री मोरे यांनी केले. यावेळी प्राप्ती पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणाल्या जलयुक्त व निसर्गपूरक जीवन: आदिवासी समाजाने पिढ्यानपिढ्या जल, जंगल आणि जमीन यांचे रक्षण केले आहे. निसर्गाला देव मानून जगणारा हा समाज पर्यावरणाचा खरा संरक्षक आहे. संस्कृती आणि परंपरा: नृत्य, संगीत, भाषा आणि लोककला हा आपल्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य भाग आहे. त्यांचे हे वेगळेपण टिकवून ठेवणे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.शिक्षण आणि विकास: समाजात शिक्षणाचा प्रसार होणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षणाशिवाय खरी प्रगती होणार नाही, त्यामुळे आदिवासी युवकांनी शिक्षणात पुढे आले पाहिजे असे सांगितले.
मुख्याध्यापक श्री .नामगे यांनी सांगितले की आपण सर्वजण येथे नऊ ऑगस्ट म्हणजेच ‘जागतिक आदिवासी दिन’ साजरा करण्यासाठी जमलो आहोत. जंगलाशी समरस होऊन राहणारा, निसर्गाचे रक्षण करणारा आणि आपली प्राचीन संस्कृती जपणारा आदिवासी समाज हा आपल्या देशाचा व संस्कृतीचा मुख्य पाया आहे.निसर्गाचे खरे रक्षक: आदिवासी समाजाने कधीही निसर्गाचे शोषण केले नाही, तर निसर्गाला देव मानून त्याचे संवर्धन केले. त्यांची जीवनशैली आपल्याला पर्यावरण रक्षणाचा मोलाचा संदेश देते.स्वातंत्र्यात मोठे योगदान: बिरसा मुंडा, तानाजी मालोजी भोसले, राघोजी भांगरिया यांसारख्या अनेक आदिवासी क्रांतीवीरांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि हक्कासाठी प्राणांची बाजी लावली. त्यांचा हा इतिहास आपल्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.शिक्षणाचे महत्त्व: आजच्या या गतिमान युगात आदिवासी समाजाने शिक्षणाच्या प्रवाहात पुढे यावे लागेल. विद्यार्थ्यांनी जिद्दीने शिकावे, मोठे व्हावे आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगून देशाच्या विकासात हातभार लावावा.शेवटी एवढेच म्हणेन, आदिवासी समाज हा आपल्या देशाचा मानबिंदू आहे. त्यांच्या हक्कांचा, संस्कृतीचा आदर करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. श्री वसावे यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले.आजच्या काळात शिक्षणाचा प्रसार वेगाने होत असला, तरी अनेक प्रश्न अजूनही सुटायचे बाकी आहेत.आपल्या तरुणांना दर्जेदार शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळणे गरजेचे आहे.आपल्या जल, जंग़ल आणि जमिनीवरील हक्क टिकवून ठेवण्यासाठी आपण एकत्र येऊन प्रयत्न केले.
पाहिजेत.आजच्या या दिवशी आपण सर्वांनी मिळून आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्याचा आणि एकजुटीने पुढे जाण्याचा संकल्प करूया. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किसन पवार यांनी केले. आभार प्रदर्शन श्री.शिंदे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी साठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले







