नंदुरबार l प्रतिनिधी-
तालुक्यातील कोपर्ली येथील नं. ता. वि. स. संचलित एस.आर.सी. इंदाणी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, कला आणि लोकजीवन यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य व्ही.के.पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने झाली. यावेळी लव गायकवाड, संतोष पवार, शांतिलाल बिरारी, कोपर्ली मराठी शाळेचे मुख्याध्यापक अनिल मालपुरे, ज्येष्ठ शिक्षक चंद्रमुणी बरडे यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविताना पारंपरिक लोककला, आदिवासी नृत्य, पारंपरिक वेशभूषा, गीतगायन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण विद्यालय परिसरात आदिवासी संस्कृतीचा जागर आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमात प्राचार्य व्ही. के.पाटील व भूषण सोनार यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगून तिच्या जतनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता राजपूत यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनिता चौधरी यांनी केले. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने कार्यक्रमाची सांगता झाली.








