Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन

team by team
August 26, 2021
in कृषी
0
नंदुरबार l प्रतिनिधी
 सन 2021-2022 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातील अन्नधान्य पिके व गळीतधान्य अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारीत कृषि औजारे व सिंचन सुविधा साधने याबाबींसाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातील अन्नधान्य पिके व गळीतधान्य कार्यक्रमांतर्गत  नंदुरबार जिल्ह्यात कडधान्य (हरभरा) आणि पौष्टिक तृणधान्य पिकासाठी बियाण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.  हरभरा बियाण्यासाठी दहा वर्षाआतील वाणास 25 रु प्रती किलो, दहा वर्षांवरील वाणास 12 रु प्रती किलो व रब्बी ज्वारी बियाण्यासाठी दहा वर्षांआतील वाणास 30 रु प्रती किलो, दहा वर्षांवरील वाणास 15 रु प्रती किलो अशा प्रमाणे एकूण किंमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देय असेल. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्यांला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय राहील.
पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध होणार आहे. त्यात बियाणे, जैविक खते, सुक्ष्म  मूलद्रव्ये, भू-सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला 1 एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधीत पिकाच्या प्रकारानुसार 2 हजार ते 4 हजार प्रती एकर मर्यादेत डीबीटीद्वारे अनुदान दिले जाईल. यासाठी कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य राहील.
पीक प्रात्यक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित कृषि सहाय्यकांशी संपर्क साधून 10 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या गटांनी  30 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2021 या कालावधीत नोंदणी करावी. योजनेसाठी शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नंदुरबार यांनी कळविले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यात मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरट्यास अटक, ५ लाख ८७ हजार रुपये किमतीच्या ११ मोटार सायकल जप्त

Next Post

अनुज्ञप्तीसाठी मासिक दौऱ्याचे आयोजन

Next Post
आरटीओ बच्छाव यांनी आज पदभार सोडला,किरण बिडकर लवकरच स्वीकारणार पदभार

अनुज्ञप्तीसाठी मासिक दौऱ्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add