Public
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public
No Result
View All Result

महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यात मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरट्यास अटक, ५ लाख ८७ हजार रुपये किमतीच्या ११ मोटार सायकल जप्त

Mahesh Patil by Mahesh Patil
August 26, 2021
in क्राईम
0
नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यात 8 गुन्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ताब्यात घेतला असून , ५ लाख ८७ हजार रुपये किंमतीच्या ११ मोटार सायकल व १ मोबाईल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
 याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी मासिक गुन्हे बैठकीत मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गुन्हे आढावा घेतला असता नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीतुन मोठ्या प्रमाणात मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल असुन बरेचसे गुन्हे अद्यापही उघडकिस आलेले नाहीत . मोटार सायकल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले होते व पोलीसांसमोर देखील चोरट्यांना जेरबंद करुन घडलेले गुन्हे उघडकिस आणणे आव्हान होते. त्या अनुषंगाने मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन मोटर सायकल चोरीचे गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी निर्देश दिले.वरिष्टांच्या वरील सूचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी मागील एक वर्षात नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत चोरी झालेल्या मोटार सायकल चोरीच्या पध्दतीचा अभ्यास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण , वेळ , दिवस किंवा चोरी होणारी विशेष कंपनीची मोटार सायकल यांची इथ्थंभूत माहिती घेवुन रेकॉर्डवरील , जेलमधुन सुटुन आलेल्या मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांवर तसेच ज्या ठिकाणावरुन जास्त प्रमाणात मोटर सायकल चोरीस जातात त्याठिकाणी पाळत ठेवून होते. तसेच आपले बातमीदारांमार्फत माहिती घेवुन मोटर सायकल चोरांचा शोध घेत होते . दि. 25 ऑगस्ट  रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांन धडगाव गावात एक इसम कमी किमतीत व विना कागदपत्राची मोटर सायकल विक्री करण्यासाठी येणार आहे.अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ एक पथक तयार करुन धडगांव येथे खात्री करुन पुढील कारवाई करण्यासाठी पाठविले . स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धडगांव येथे जावुन संशयीत इसमास मोटार सायकलसह ताब्यात घेतले . त्यास नाव विचारले असता त्याने त्याचे नाव देविदास उर्फ बादशहा कैलास राऊत ,  रा . काटीचा राऊतपाडा ता अक्कलकुवा  असे सांगितले . संशयीत इसम हा पोलीस अभिलेखावरील आरोपी असुन त्यास विश्वासात घेवुन अधिक विचारपुस करता त्याने महाराष्ट्रातील नंदुरबार , धुळे व गुजरात राज्यातुन विवि ठिकाणाहुन वेग – वेगळ्या कंपनीच्या मोटर सायकली चोरी तसेच मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली . तसेच चोरी केलेल्या मोटार सायकल त्याने त्याच्या काठीचा राऊतपाडा येथील मक्याच्या शेतात लपवुन ठेवल्या होत्या व  मोबाईल हा घरात ठेवला आहेत.असे सांगितले.याबाबत  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संशयित इसमाच्या गावातील शेतातुन 5 लाख 80 हजार रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या 11 मोटार सायकल, एक मोबाईल असा एकुण 5 लाख 87 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत ताब्यात घेण्यात आलेल्या मोटार सायकलबाबत  अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा 3 गुन्हे, धडगांव पोलीस ठाण्यात 1 , मोलगी पोलीस ठाण्यात 1 , दोंडाईचा जि , धुळे पोलीस ठाण्यात 1 , निझर ( गुजरात ) पोलीस ठाण्यात 1 , डेडियापाडा पोलीस ठाण्यात ( गुजरात ) 1 गुन्हा याप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील ( 5 गुन्हे , धुळे जिल्ह्यातील 1 गुन्हा तर गुजरात राज्यातील 2 गुन्हे असे एकुण 8 मोटार सायकल चोरी गुन्हे व अक्कलकुवा पोलीस ठाणे येथील 1 मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकिस आलेले आहेत . तसेच इतर मोटार सायकल चोरी बाबत खात्री करुन पुढील कारवाई सुरु असुन आणखी काही मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कळविले आहे . पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित , अपर पोलीस अधिक्षक  विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप – अधीक्षक ( गृह ) देवराम गवळी , स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव , सुनिल पाडवी , मनोज नाईक , विकास कापुरे , पुरुषोत्तम सोनार , अभिमन्यु गावीत , शोएब शेख , सतिष घुले यांचे पथकाने केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर पालिकेच्या कार्यालयात २७ ऑगस्ट रोजी नियोजन शून्य कारभार व सफाई कामगारांच्या प्रश्नासाठी भाजपातर्फे ‘ कचराफेक ‘ आंदोलन

Next Post

शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एस.ए.मिशन येथे १२०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

एस.ए.मिशन येथे १२०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

June 25, 2022
नवापूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात

नवापूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात

June 25, 2022
बिलाडी त.सा गावातील घरकुल यादी मध्ये मोठा भ्रष्टाचार ; ग्रामस्थांचा उपोषणाचा ईशारा

बिलाडी त.सा गावातील घरकुल यादी मध्ये मोठा भ्रष्टाचार ; ग्रामस्थांचा उपोषणाचा ईशारा

June 25, 2022
राज्य संस्थाचालक महामंडळावर राजेंद्र कृष्णराव गावित यांनी निवड, भास्करराव पाटील यांनी केला सपत्नीक सत्कार

राज्य संस्थाचालक महामंडळावर राजेंद्र कृष्णराव गावित यांनी निवड, भास्करराव पाटील यांनी केला सपत्नीक सत्कार

June 25, 2022
नागरिकांना नदीतून पुराच्या पाण्यात करावा लागतोय जीवघेणा प्रवास

नागरिकांना नदीतून पुराच्या पाण्यात करावा लागतोय जीवघेणा प्रवास

June 24, 2022
जिल्ह्यात नव्याने बाल न्याय मंडळ व बाल कल्याण समिती गठीत

जिल्ह्यात नव्याने बाल न्याय मंडळ व बाल कल्याण समिती गठीत

June 24, 2022

एकूण वाचक

  • 1,659,224 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group