Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विशेष शिबिरांतर्गत आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ग्रामस्थांना विविध दाखले वितरित

team by team
November 17, 2026
in राजकीय
0
विशेष शिबिरांतर्गत आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ग्रामस्थांना विविध दाखले वितरित

नंदुरबार l प्रतिनिधी-

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती जनजातीय गौरव दिन आणि जनजातीय गौरव सेवा सप्ताह-2026 या अंतर्गत धानोरा येथे घेण्यात आलेल्या विशेष शिबिरात माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित व भाजपाच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले तसेच योजनांच्या लाभासाठी अर्ज भरून घेण्यात आले.

 

 

प्रमुख उपस्थितीत क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाकडून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. उपस्थित ग्रामस्थांना आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका,जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेयर, रहिवास / अधिवास दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र यासह विविध कागदपत्रे पूर्ण करून वितरित करण्यात आले.

या शिबिराला तहसीलदार नंदुरबार संतोष डेरे, गटविकास अधिकारी नंदुरबार अर्चना वाघ,नायब तहसीलदार श्री प्रांजल पाटील,धानोरा येथील राजकीय पदाधिकारी, शासनाच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी आणि धानोरा महसूल मंडळातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांना उद्देशून डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की, पिवळ्या आणि केसरी कार्ड धारकांना पूर्वी शासकीय स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत होते परंतु विभाजन केल्यामुळे त्यांच्यापैकी सफेद कार्ड धारकांना धान्य मिळणे बंद झाले. त्यांनी त्यांचे जुने रेशन कार्ड आणि नवीन रेशन कार्ड सबमिट केलं तर, त्या कार्ड धारकांना पुन्हा धान्य मिळणे सुरू होईल. राज्य सरकारने त्याबाबतचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. तरी ग्रामीण जनतेने याचा लाभ घ्यावा; असे आवाहन याप्रसंगी माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले.

तर डॉक्टर सुप्रिया गावित यांनी उपस्थित ग्रामस्थांना आवाहन करताना सांगितले की, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदाही शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. सध्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अग्रीम मदत दिली जात असून त्या पार्श्वभूमीवर पात्र शेतकऱ्यांना मदतीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक नोंदणी व पडताळणी प्रक्रिया पूर्ण असणे गरजेचे आहे. प्रत्येकाने ते करून घ्यावे, असे आवाहन केले. दरम्यान, शासनाच्या विविध विभागाच्या योजनांची माहिती शिबिरात देण्यात आली. विविध विभागाकडून योजनांच्या लाभाची प्रमाणपत्रे आमदार डॉ गावित यांच्या व सुप्रियाताई यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सर्व मान्यवरांनी ग्रामस्थांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याबाबतचे आवाहन केले. तसेच योजनेची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

अनेक वर्ष सत्तेत असूनही काँग्रेसनेच आदिवासींचा गौरवशाली इतिहास दाबला; डॉ. हिना गावित

Next Post

आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

Next Post
आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

November 17, 2026
विशेष शिबिरांतर्गत आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ग्रामस्थांना विविध दाखले वितरित

विशेष शिबिरांतर्गत आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ग्रामस्थांना विविध दाखले वितरित

November 17, 2026
अनेक वर्ष सत्तेत असूनही काँग्रेसनेच आदिवासींचा गौरवशाली इतिहास दाबला; डॉ. हिना गावित

अनेक वर्ष सत्तेत असूनही काँग्रेसनेच आदिवासींचा गौरवशाली इतिहास दाबला; डॉ. हिना गावित

November 17, 2026
मंत्री अशोक उईके यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांची घेतली सदिच्छा भेट

मंत्री अशोक उईके यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांची घेतली सदिच्छा भेट

November 13, 2026
आदिवासींच्या गौरवशाली संस्कृती परंपरांचा सन्मान करण्यासाठी जनजाती गौरव सेवा सप्ताह : डॉ.विजयकुमार गावित

आदिवासींच्या गौरवशाली संस्कृती परंपरांचा सन्मान करण्यासाठी जनजाती गौरव सेवा सप्ताह : डॉ.विजयकुमार गावित

November 13, 2026
आदिवासी भाषा संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासोबतच व्यसनमुक्तीसाठी एकत्रित कार्य आवश्यक:  डॉ.हिना गावित

आदिवासी भाषा संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासोबतच व्यसनमुक्तीसाठी एकत्रित कार्य आवश्यक: डॉ.हिना गावित

November 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add