Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जल जीवन मिशन अंतर्गत शाळा आणि अंगणवाड्यांची कामे प्राधान्याने करा- मनीषा खत्री

team by team
August 25, 2021
in राज्य
0
नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पदभार स्विकारला
नंदुरबार l प्रतिनिधी
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक शाळा आणि अंगणवाड्यांना नळाने पाणी देण्यासाठी आवश्यक कामे प्राधान्याने पूर्ण करा असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जल जीवन मिशनबाबत आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, कार्यकारी अभियंता पी.आर.गरेवार, शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी आदी उपस्थित होते.
श्रीमती खत्री यांनी जिल्ह्यातील अ, ब आणि क वर्गात येणाऱ्या गावातील पाणी योजनांचा  आढावा घेतला. नळ पाणी पुरवठा योजनेसाठी आवश्यक शाश्वत स्त्रोताचा शोध घेण्यात यावा आणि काही ठिकाणी पाणी अडवून स्त्रोत उपलब्ध करावा. प्रायोगिक तत्वावर काही गावांना मिळून एकच योजना राबविण्याबाबत शक्यतेचाही विचार करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.
मिशन अंतर्गत अस्तित्वात असलेल्या योजनेत किरकोळ स्वरुपाची कामे असल्यास अशी गावे किंवा वस्त्या अ गटात,  योजनेत अधिक दुरुस्ती किंवा बदल आवश्यक असलेल्या वस्त्या ब गटात आणि कोणतीही योजना नसलेली गावे किंवा वस्त्या क गटात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. अ गटातील 54, ब गटातील 588 आणि क गटातील 302 गावे अशा एकूण 944 गावातील 2952 वस्त्यांसाठी एकूण 1658 कोटी 34 लक्ष रुपयांच्या नळ पाणी पुरवठा योजनांचा आराखड्यात समावेश  करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
बातमी शेअर करा
Previous Post

चर्मकार समाजातील गुणवंतांचा गौरव विविध क्षेत्रातील कोरोनायोध्दांचा सन्मान

Next Post

नंदुरबार येथे क्षत्रिय मराठा परिवार संघटनेतर्फे कोरोना योध्द्यांचा सत्कार

Next Post
नंदुरबार येथे क्षत्रिय मराठा परिवार संघटनेतर्फे कोरोना योध्द्यांचा सत्कार

नंदुरबार येथे क्षत्रिय मराठा परिवार संघटनेतर्फे कोरोना योध्द्यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add