नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील श्री संत शिरोमणी रविदास व्यायामशाळा व समस्त चर्मकार समाज नंदुरबार यांच्या विद्यमाने आयोजित गुणगौरव सोहळ्यातून समाजातील विविध परीक्षा व क्षेत्रांमध्ये यश मिळविणार्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच कोरोना महामारी काळात विशेष कामगिरी बजविणार्या समाजबांधवांचा देखील सन्मान करण्यात आला.
नंदुरबार शहरातील श्री संत शिरोमणी रविदास चौकात गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेताजी सुभाषचंद्र बोस मंडळाचे अध्यक्ष ईश्वर चौधरी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार पालिकेतील बांधकाम सभापती प्रमोद शेवाळे, चर्मकार समाजातील राष्ट्रपती पोलिस पदक प्राप्त सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दगडु अजिंठे, ज्येष्ठ नागरीक चतुर अहिरे, शंकर अहिरे, चर्मकार समाजाचे नंदुरबार अध्यक्ष विजय अहिरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात चर्मकार समाजातील इयत्ता दहावी, बारावी व विविध शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात प्राविण्य यश मिळविणार्या जयश्री पवार, कोमल अहिरे, जयेश अहिरे, निकिता अहिरे, भाग्यश्री पवार, वैशाली सूर्यवंशी, जगदिप अहिरे, धिरज अहिरे, हंसराज अहिरे, कुणाल अहिरे, अमित अहिरे, आकाश अहिरे, कुणाल रजनिकांत अहिरे, सिध्दार्थ अहिरे, रोहित अहिरे, ललित अहिरे, विशाल अहिरे, चेतन तिजविज, रोहित अहिरे, दिनेश अहिरे, गायत्री समशेर, जयेश जाधव, वेदांत चव्हाण, मयुर अहिरे या यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा प्रमाणपत्रासह शैक्षणिक साहित्य देवून गौरविण्यात आले. तसेच कोरोना महामारी काळात पोलीस, प्रशासकीय, वैद्यकीय, बँक या क्षेत्रांमध्ये सेवा बजविणार्या प्रकाश अहिरे, विजय ठाकरे, रवि पवार, विजय अहिरे, प्रविण पवार, उज्वला अहिरे, कलाबाई अहिरे, कविता समशेर, अभिलाशा अहिरे या कोरोनायोध्दांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पालिकेचे बांधकाम सभापती प्रमोद शेवाळे यांनी समाजाच्या प्रगतीसाठी महिला सशक्तीकरणासह शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ईश्वर चौधरी यांनी मनोगतातून शिक्षणाचे महत्त्व समजावुन सांगितले. सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दगडू अजिंठे यांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमेश मलखेडे यांनी केले. आभार विजय अहिरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिपक अहिरे, धनराज अहिरे, सुरेश अहिरे, प्रविण अहिरे, मुकेश अहिरे, राकेश कंढरे, मोहन अहिरे, संजय अहिरे, हंसराज अहिरे, हरिष अहिरे, अर्जुन अहिरे, मनोज समशेर, राजेंद्र पवार, ईश्वर सोनवणे, गंगाराम झांझरे, महेंद्र चव्हाण, विनोद अहिरे, संतोष अहिरे, राजु अहिरे, विनायक अहिरे, नितीन अहिरे, अशोक अहिरे, नंदलाल अहिरे आदींनी परिश्रम घेतले.